Search

दालचिनी काढणी पश्चात तंत्रज्ञान

दालचिनी काढणी पश्चात तंत्रज्ञान
[Total: 3    Average: 2.3/5]

दालचिनी हे सदाहरित झाड आहे. वर्षभरात कधीही यांचे पाने गळून पडत नाहीत व ६ ते ८ मीटर उंच वाढते. झाडाच्या फांद्या तोडून त्यांची साल काढण्यात येते, आतली कोरडी साल म्हणजे दालचिनी आहे. पारंपरिक काळापासून दालचिनीचा स्वयंपाकात व आयुर्वेदिक औषधांमध्ये वापर केला गेला आहे. दालचिनी लागवड अतिपावसाळा सोडून कोणत्याही महिन्यात करता येते. नारळाच्या बागेत लागवड करायची झाल्यास झाडापासून दोन मीटर अंतरावर लागवड करावी.

cinnamon-tree

दालचिनीच्या झाडाची साल ‘दालचिनी’ म्हणून तर पानांचा तमालपत्र म्हणून मसाल्यात उपयोग होतो. कोकण कृषी विद्यापीठाने विद्यापीठाने ‘कोकण तेज’ नावाची दालचिनीची सुधारित जात निर्माण केली आहे. या जातीची दालचिनी उत्तम प्रतीची व चांगल्या वासाची आहे. दालचिनीच्या ‘नित्यश्री’ व ‘नवश्री’ या इतर प्रसारित जाती आहेत. तसेच, तामालपत्रासाठी ‘कोकण तेजपत्ता’ म्हणून जात विकसित केली आहे. अशा बहुगुणकारी दालचिनीची काढणी कशी आणि केव्हा करावी हे जाणून घेणे महत्वाचे आहे.

काढणी आणि उत्पन्न:

दालचिनीचे गुटी कलमाचे झाड तीन वर्षे वयाचे झाल्यावर सालीची पहिली काढणी करावी. पुढे एक ते दोन वर्षानंतर तयार फाद्यांची काढणी करावी. साल काढणीचा हंगाम नोव्हेंबर ते एप्रिलपर्यंत असतो. साल काढणीपुर्वी चाकूच्या सहाय्याने २ सें. मी. चौकोनी काप घेऊन साल काढावी. साल झाडापासून सहज सुती होते याची खात्री करावी. नंतर हे झाड जमिनीपासून २० ते २५ सें. मी. अंतरावर करवतीच्या किंवा कोयत्याच्या सहाय्याने कापावे आणि कापलेल्या फांद्यावरील हिरवा भाग सोडून तपकिरी रंगाची जेवढी साल असेल ती काढून सुकविलि जाते. अशा रीतीने सालीपासून दालचिनी तर सावलीत पाने सुकवून तमालपत्र तयार करतात.

काढणीची योग्य वेळ कोणती? 

काढणीचे काम सकाळी लवकर करावे. फांद्या कापल्यानंतर एक फुटाचे तुकडे करून लगेच विरुद्ध बाजूने दोन उभे काप देऊन साल काढावी.

Harvest Cinemon

काढणी नंतर काय करावे?

काढलेल्या सालीचे पट्टे काढलेल्या काठ्यांवर पुन्हा बांधावेत व सावलीत ४ ते  ६ दिवस वाळवावेत. त्यानंतर सदर साल उन्हात दोन तास वाळवून हि दालचिनी प्लॅस्टिक पिशवीत कमीव हवाबंद डब्यात साठवावी.

योग्य काढणीचे फायदे?  

योग्य आणि तंत्र शुद्ध पद्धतीने काढणी आणि कापणी केली असता कापलेल्या भागाखाळून ४-५ नवीन फांद्या येतात आणि त्या सरळ वाढतात. नंतर एक ते दोन वर्षांनी ह्या फांद्या जेव्हा १ ते १. मीटर लांब व पेन्सिलीच्या जाडीच्या आणि सुमारे ९० टक्के खाकी रंगाची साल असताना त्याची तोडणी करावी. तोडणी करताना फांद्यांवर दोन पर ठेवावेत.

सातव्या वर्षानंतर एक झाडापासून ३०० ग्रॅम दालचिनी साल व अर्धा किलो वळलेली पाने (तमालपत्र) मिळतात.

cinnamonअशाप्रकारे जर योग्य नियोजन केले तर दालचिनी चे पीक दुहेरी नफा नक्की मिळवून देऊ शकते.

Related posts

Shares