Search

आले – काढणी पश्चात तंत्रज्ञान – भाग – १

आले – काढणी पश्चात तंत्रज्ञान – भाग – १
[Total: 6    Average: 3.5/5]

शेती करताना दर्जेदार पिक यावे यासाठी मेहनत घेणे गरजेचे असते. योग्य जमिनीची निवड करून त्याची मशागत करून मग ठरवलेलं पीक घ्यावे. एकदा का पिक तयार झाले कि मग त्याची काढणी करावी हे टप्पे शेती करताना महत्वाचे ठरतात. प्रत्येक पिक तयार झाल्यानंतर त्याची काढणी कधी करावी याचा एक ठराविक कालावधी असतो.  महाराष्ट्रातही आले हे पैसे मिळवून देणारे पीक म्हणून शेतकरी त्याकडे आकर्षित होऊ लागले आहेत. महाराष्ट्रात प्रामुख्याने सातारा, सांगली, रायगड, ठाणे, औरंगाबाद, लातूर, नांदेड या जिल्ह्यामध्ये आल्याची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. आल्यापासून मिळणाऱ्या आर्थिक मोबदल्याचा विचार करता खानदेश व विदर्भातही या पिकाखालील क्षेत्रात वाढ होत असल्याचे दिसून येते. आले या पिकाची काढणी कधी करावी याबाबत माहिती आपण जाणून घेऊया.

आले पिकाचा खोडवा ठेवताना घ्यावयाची काळजी:

 • जस जसे आल्याचे पिक मोठे होत जाते तसे त्याची पाने सुकत जातात. मात्र असे झाले तरी पाणी देणे थांबवू नये मात्र कमी जरूर करावे.
 • पाणी देताना आल्याचा पाला कुजणार नाही, याची खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे आहे.
 • आल्याचे कंद उघडे असल्यास कंद झाकून घ्यावेत.
 • शक्य असेल तर कंद झाकून ठेवताना सेंद्रिय आच्छादनाचा वापर करावा. यासाठी आपण उसाचा पाला, भाताचे काड, सुकलेले गवत इत्यादींचा वापर करू शकतो.
 • आले पिकास आठवड्यातून एकदा पोटॅशयुक्त खत देणे आवश्यक आहे.
 • आले पिक उन्हामध्ये सुकण्याची शक्यता असते हे लक्षात घेता पिकाच्या गादीवाफ्याच्या बाजूला वेलवर्गीय भाज्यांची लागवड करावी. यासाठी काकडी, कलिंगड, खरबूज इत्यादींच्या बिया टाकून लागवड करावी. अशाप्रकारे वेलींची वाढ झाल्यास त्याची सावली गादीवाफ्यावर पडेल आणि आले सुकणार नाही.
 • लागवड केल्यानंतर साधारणतः ३ ते ४ आठवड्यांनी आले फुटण्यास/ उगवण्यास सुरुवात होते.
 • आवश्यकतेनुसार कीटकनाशकाची फवारणी करून किडींचा प्रादुर्भाव रोखावा.

काढणी करताना घ्यावयाची काळजी :

 • आले पिक पूर्णपणे तयार होण्यासाठी लागणारा साधारण सात ते आठ महिन्याचा कालावधी लागतो. हे लक्षात घेत आठ महिने पूर्ण झाल्यानंतर पाणी कमी करत जाऊन नऊ महिने पूर्ण झाल्यानंतर पाणी बंद करावे.
 • ७० ते ८० टक्क्यांपेक्षा अधिक पाने सुकल्यानंतर पाला कापून काढावा. पाला कापल्यानंतर हलकेसे पाणी देऊन आल्याची काढणी करावी.
 • प्रक्रियेसाठी आले वापरावयाचे असल्यास नऊ महिने पूर्ण झाल्याशिवाय आल्याची काढणी करू नये.
 • आल्याची काढणी केल्यानंतर त्यास चिकटलेली माती स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावी आणि आले सावलीत सुकवावे.
 • आल्याची प्रतवारी करून कुजलेले आले वेगळे करावे. विक्रीसाठी नेताना आले गोणपाटाच्या पोत्यामध्ये किंवा प्लॅस्टिकच्या क्रेटमध्ये भरून ठेवावे.

यानंतर पुढील भागात आपण काढणी झाल्यानंतर आल्यापासून कोणते पदार्थ तयार केले जातात आणि त्यासाठी काय तंत्रज्ञान आहे याचा आढावा  घेऊया.  

Related posts

Shares