Search

मसाला पिकांचे काढणी पश्चात तंत्रज्ञान – भाग – १ -मिरी –

मसाला पिकांचे काढणी पश्चात तंत्रज्ञान – भाग – १ -मिरी –
[Total: 0    Average: 0/5]

जगात मिरी लागवड करणाऱ्या देशात भारत, इंडोनेशिया, मलेशिया, ब्राझील व श्रीलंका हे प्रमुख आहेत. पैकी भारताचा प्रथम क्रमांक आहे. भारतात पिकविल्या जाणाऱ्या मसाल्याच्या पदार्थांमध्ये मिरी हे एक महत्वाचे पीक आहे. मीर लागवड झाल्यानंतर काढणी कशी करावी आणि काढणी पश्चात कोणत्या तंत्राचा अवलंब करावा हे जाणून घेऊया.
काढणीचा कालावधी :
काळी मिरीच्या वेलांची लागवड केल्यानंतर तीन वर्षांनंतर किफायतशीर उत्पादन सुरू होते. साधारणपणे मे- जून महिन्यात मिरीला तुरे येतात आणि जानेवारी ते मार्च या कालावधीत मिरीचे घड काढणीस तयार होतात. हिरव्या घडातील एक- दोन दाण्यांचा रंग पिवळा अगर नारिंगी होताच घड तोडावेत, नंतर त्या घडातील मिरीचे दाणे हातांनी वेगळे करावेत किंवा तयार केलेल्या जमिनीवर घडांचे ढीग उन्हात वाळवावेत.

Fresh pepper bush in Borneo,Malaysia.

ही पद्धत मोठ्या प्रमाणावर एकाच वेळी घड तयार झाले तरच वापरतात. हिरव्या मिरीपासून काळी मिरी तयार करण्यासाठी दाणे बांबूच्या करंडीत गोळा करावेत किंवा पातळ फडक्याात गुंडाळावेत.
काढणी आणि उत्पन्न :
मिरीच्या वेलाला साधारणतः तिसऱ्या वर्षापासून फळे धरू लागतात. आठव्या वर्षापासून भरपूर पीक मिळते. एप्रिल ते जून महिन्यात मोहोर येऊन जानेवारी- मार्चमध्ये फळे तोडण्यास तयार होतात. मिरीच्या घोसातील १ ते २ दाणे पिवळे किंवा तांबडेलाल होताच मिरीचे सर्व घोस काढावेत.
Image 1
दुसऱ्या दिवशी या घोसातील मिरीचे दाणे वेगळे करून बांबूच्या करंडीत किंवा मलमलच्या कापडात भरून उकळत्या पाण्यात एक मिनिट बुडवावेत. किंवा थेट उकळत्या पाण्यात टाकावी. नंतर कापडात काढून ठेवावी.
Image 2
उकळत्या पाण्यामध्ये बुडवून घेतलेली मिरी उन्हामध्ये ३ ते ४ दिवस चांगली वळवावी. वाळल्यानंतर मिरीच्या दाण्यांना सुरकुत्या पडतात आणि गडद काळा रंग येतो.
Image 3
पूर्ण वाढ झालेल्या एका वेलापासून सरासरी पाच किलो हिरव्या मिरीचे उत्पन्न मिळते.व त्यापासून सुमारे दीड किलो वाळलेली काळी मिरी मिळते.

Image 4Image 5
हिरव्या मिरीच्या दान्यावरील साल काढून पांढरी मिरी देखील तयार केली जाते. काळ्या मिऱ्यापासून पांढरी मिरपूड तयार करण्याची एक निराळी पद्धती त्रिवेंद्रम येथील प्रादेशिक प्रयोगशाळेने शोधून काढली आहे. या पद्धतीत काळी मिरी शुष्क पद्धतीने दळतात. नंतर आंशिक अलगीकरण पद्धतीने पांढरा भाग वेगळा काढतात आणि मागे राहिलेल्या काळ्या सालीपासून तेल व ओलिओरेझीन काढता येते.
यूरोपीय बाजारात ताजी हिरवी मिरी विशेष पसंत करतात. यासाठी अशी मिरी हवाबंद डब्यात भरून अथवा बाटल्यांतून लोणच्याच्या स्वरूपात पाठविण्याची पूर्वापार पद्धत आहे. हिरवी मिरी हवाबंद डब्यात भरण्यासाठी सुधारित पद्धतीत थोड्याशा अपक्व स्थितीतील घोस वेलींवरून काढून मिरी मोकळी करतात व क्लोरीनच्या पाण्यात ३० मिनिटे बुडवून ठेवतात. नंतर ती स्वच्छ धुवून डब्यात इच्छित पातळीपर्यंत भरतात. डबे २% मिठाच्या द्रावणाने भरतात. त्यानंतर ते उष्णतेच्या साह्याने निर्जंतुक करून हवा बंद करतात. मिठाच्या पाण्यात अनुज्ञात समावेश पदार्थ मिसळलेले असतात. बाटल्या हवाबंद करण्यासाठी २% मिठाच्या द्रावणाऐवजी १५ ते २०% मिठाचे द्रावण वापरतात.
आणि अशाप्रकारे आपल्या किचन मधील महत्वाचा मसाले पदार्थ ठरत मिरी आपल्या अन्नाला अधिक चविष्ट बनवते.

फोटो कर्टसी : मिसळपाव डॉट कॉम

Related posts

Shares