Search

क्षणात जाणून घ्या, कशी करावी कोळंबी शेती…

क्षणात जाणून घ्या, कशी करावी कोळंबी शेती…
[Total: 11    Average: 3/5]

शेती हा बिन भरवशाचा उद्योग असल्याच म्हटलं जात. बहुतांश प्रमाणात निसर्गावरच सगळे अवलंबून असते आणि एकदा का निसर्गाने पाठ फिरविली कि मग पदरी निराशा पडते. पण, जर उपलब्ध जागेत योग्य नियोजन करून त्याला जर मेहनितीची जोड दिली तर कोळंबी शेती नक्कीच फायदेशीर ठरू शकते. वातावरणीय बदलाचा परिणाम समुद्री जीवांवर होत असल्याच सत्य आपण जाणतोच. कदाचित म्हणूनच कोळी बांधवांना मासेमारीसाठी समुद्रात खोलवर जावे लागत आहे. यावर, तोडगा शोधायचा झाल्यास कोळंबी शेती हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.

मुख्यत्वे कोकणात मत्स्य शेती केली जाते. मुंबई नजीक असलेल्या पालघर, डहाणू परिसरात “कोळंबी  शेती” करण्यावर भर दिला जात आहे. कोकणामध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग अश्या विविध जिल्ह्यांमध्ये कोळंबी शेती केली जात आहे. दर्जेदार कोळंबी ला परदेशात आणि मोठ्या हॉटेल्स मध्ये मागणी असल्यामुळे चांगला भाव मिळतो, तसेच मागणी लक्षात घेत निर्यात केली जाते.

तलाव आणि पाणी

कोळंबी शेती करण्यासाठी आवश्यक बाब म्हणजे जागा आणि पाणी. कमीत कमी दहा गुंठ्याच्या जागेतही तलावाची निर्मिती करून कोळंबी शेती करता येऊ शकते. अतिरिक्त पाणी, शेती आणि इतर कारणाने क्षारपड आणि नापिक झालेल्या जमिनीत तळे खोदून या कोळंबीचे उत्पादन घेता येते. महत्वाची बाब म्हणजे तलावाला एका जागी उतार असावा. यामुळे पाणी बदलणे सोयीचे होते आणि तयार उत्पादन बाहेर काढण्यास मदत होते. तलावाच्या तळाशी चिकणमातीचा लेप लावणे गरजेचे आहे. कोळंबी शेती करताना जमिनीचा सामू महत्वाची भूमिका बजावतो. मातीतील सामूचे प्रमाण हे पाहून शास्त्रीय परीक्षेनंतरच जागेची निवड करावी. तलावाची निर्मिती करताना पाण्याची उपलब्धता खूप गरजेची आहे. उपलब्ध पाण्यात क्षार किती प्रमाणात आहे याचा अभ्यास करणे आवश्यक आहे. तलावाची रचना, माती सामू, पाणी, क्षार अशा तांत्रिक गोष्टींसाठी कृषी विद्यापीठातील आणि रत्नागिरी येथील सागरी जीव संशोधन केंद्रातील तज्ज्ञ मदत करतात.

उत्पादनाची पद्धत

कोळंबीचे उत्पादन साधारणत: सात ते आठ महिन्यात येऊ शकते. काही वेळा हा कालावधी कमी अधिक असू शकतो यामुळेच, सहा महिन्यांनंतर सतत चाचपणी करणे गरजेचे असते. उत्तम कोळंबी उत्पादनासाठी महत्त्वाचं असतं उत्तम प्रतीचे बीज. जर कोळंबीचे बीज चांगले असेल तरच उत्पादन निरोगी आणि सुदृढ असेल. आणि उत्पादनाला चांगला बाजारभाव मिळेल.  कोळंबीचे बीज तयार करण्यासाठी विशिष्ट वातावरण गरजेचे असते. रत्नागिरी येथील सागरी जीव शास्त्रीय संशोधन केंद्रात दर्जेदार बिजं विकत मिळतात त्याला ‘हॅचरिज’ असं म्हणतात.

जंबो कोळंबी संवर्धन

मॅक्रोब्रॅकीयम रोझनबर्गी या कोळंबीला जंबो कोळंबी, महाझिंगा, पोचा, खटवी इत्यादी विविध नावांनी ओळखतात. या जातीच्या बीजाच्या कॅरापेसवर (डोक्‍यावरील कवचावर) आडवे तीन ते सहा पट्टे असतात.  इतर सर्व जातींच्या कोळंबीपेक्षा जलद वाढते. वर्षभरात या जातीचा नर साधारणपणे 70-100 ग्रॅमपर्यंत वाढतो, तर मादी 35 ते 70 ग्रॅमपर्यंत वाढते. ही कोळंबी अत्यंत चविष्ट आहे, त्यामुळे या कोळंबीला देशात तसेच परदेशात प्रचंड मागणी आहे, दरही भरपूर मिळतो.  कृत्रिम खाद्याबरोबरच कोळंबीला कणी, कोंडा, पेंड, मासे, खाटीकखान्यातले टाकाऊ मांस, धान्यकण इ. पूरक खाद्य देता येते.  ही कोळंबी गोड्या पाण्यात तसेच पाच क्षारतेपर्यंतच्या मचूळ पाण्यात वाढते. तसेच 18 ते 34 अंश सें. या दरम्यान तापमान असले तरीही जगते. जंबो कोळंबी रोगाला सहजासहजी बळी पडत नाही.

खते आणि मत्स्य अन्न

मत्स्यशेतीतील एक चांगली बाब म्हणजे सेंद्रिय पदार्थ, ज्यातून कल्शिअम, नत्र अधिक प्रमाणात मिळतं. त्याचा माशांना अन्न म्हणून उपयोग होतो. त्यामुळे पौष्टिक खतांची पिशवी पाण्यात ठेवली, पाणशेवाळ यांचा अन्न म्हणून वापर होतो. कोंबडय़ांची विष्ठासुद्धा खत म्हणून वापरली जाते.

शास्त्रशुद्ध उत्पादनासाठी उत्तम प्रकारचे अन्न वापरले जाते. भाताचा कोंडा, शेंगदाण्याची पेंड आणि सुकट हे पदार्थ साधारणत: अन्न म्हणून वापरले जातात. हे अन्न बाजारात तयार मिळते. ते कणीच्या स्वरूपात असते.

कोळंबी शेती करण्यापूर्वी घ्यावयाची काळजी

१) जंबो कोळंबी सोबत मृगल, सायप्रीन्स तसेच इतर मांसाहारी माशाचे बीज तलावात सोडू नये.

२) मत्स्यशेतीला सुरवात करण्यापूर्वी तलावाचा तळ भेगा पडेपर्यंत उन्हात आठवडाभर तापवावा. तलावाचा तळ नांगरून घ्यावा, त्यामुळे तळातील दूषित वायू बाहेर निघून जातात.

४) काही वेळेला तलावातील सगळे पाणी काढून तलाव रिकामा करणे शक्यन नसते. अशा वेळी तलावातील पाणवनस्पती काढून टाकावी लागतात. बांधाच्या उतारावरील वनस्पती त्या पाण्यात बुडण्यापूर्वी काढाव्यात. बांधाला बळकटी आणणाऱ्या वनस्पती उदा. हरळी, बांधावर ठेवावी.

५) तलावातील उपद्रवी मासे नष्ट करावेतच. याकरिता वारंवार जाळी फिरवून असे मासे काढून नष्ट करावेत.

६) तलावाच्या बांधावर बांधाच्या उंचवट्यापासून साधारण 25 ते 30 सें.मी. खाली योग्य त्या व्यासाची ओव्हर फ्लो पाइप बसवावा, जेणेकरून पावसाळ्यात तलावात जमा होणारे जादा पाणी या पाइपमधून बाहेर जाईल. या पाइपला आतून जाळी लावणे आवश्‍यक आहे. कारण त्यामुळे तलावातील मासळी बाहेर जाणार नाही.

जर पाण्याचा नियमित पुरवठा असेल किंवा उत्तम जलसाठा असेल तर कोळंबी शेतीत मेहनत केल्यावर फायदाच फायदा आहे.

मत्स्यशेती प्रशिक्षण देणा-या संस्था :-

नागपूर पशुवैद्यक महाविद्यालय सेमिनरी हिल्स, नागपूर

कॉलेज ऑफ फिशरी सायन्स, तेलंगखेडी, नागपूर

पशुवैद्यक महाविद्यालय परळ, मुंबई

सागरी जीव संशोधन केंद्र, रत्नागिरी

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Related posts

Shares