Search

काढणी नंतर फुलांची साठवणूक करण्यासाठी आवश्य वाचा…

काढणी नंतर फुलांची साठवणूक करण्यासाठी आवश्य वाचा…
[Total: 0    Average: 0/5]

फुला फुलाच्या बांधून मला मंडप घाला हो दारी… रंगीबेरंगी फुले कोणाला आवडत नाही. केवळ रंगातच नाही तर आकार, सुवास अशी विविधता फुलांमध्ये आढळते. प्रत्येक फुलाचा आपला एक ठराविक कालावधी असतो. फुले ठराविक कालावधी असतो. सध्या हरितगृहात १२ महिने फुलांचे उत्पादन घेणे शक्य आहे. यासाठी विशेष काळजी घेणे गरजेचे असते. मात्र, तयार झालेली फुले लगेच बाजारात नेता येतीलच असे नाही. यामुळे, फुलांचे संवर्धन करावे लागते. म्हणूनच फुलांची काढणी झाल्यानंतर फुलांचे संवर्धन कसे करावे? यासाठी तंत्रज्ञान कोणते आहे ते जाणून घेऊया.

काढणी:

फुले काढताना ती किती पक्व झाली आहेत यावर काढणी नंतर ती किती काळ टिकतील हे निश्चित होते.काढणीची अवस्था, पद्धत आणि वेळ मुख्य भूमिका पार पडते. शक्यतो सगळी फुले संध्याकाळच्या वेळी काढली जातात. गुलाबाची काढणी शक्यतो काळी घट्ट असताना केली जाते.

हाताळणी:

फुलांना चांगला दर मिळावा यासाठी फुलांचा आकार, त्यांचा विस्तार, रंग आणि पक्वता यांचा दर्जा चांगला असणे गरजेचे असते. कट फ्लॉवर्स ची काढणी झाल्यानंतर बोत्रायटिक हा प्रमुख रोग आढळतो. काढणी नंतरच्या हाताळणीस उशीर झाला तर फुलाच्या गुणवत्तेत बरीच घट  येते.  यामुळे काढणी नंतरची हाताळणी महत्वाची ठरते. तसेच, हरितगृह आणि पॅकींगची खोली स्वच्छ असणे खूप आवश्यक आहे.

प्रीकुलिंग:

थंड हवामानामुळे फुलांचा श्वसनाचा दर कमी होतो. यामुळे पाण्याचा दर कमी होत नाही आणि इथिलिनचे प्रमाण कमी होते आणि परिणामी फुलाचे आयुष्य वाढते. प्रीकुलिंगसाठी मुख्यत्वे दोन गोष्टी वापरल्या जातात. १) खोली शीतकरण २) बलावाटे  शीतकरण.

खोलीत शीतकरण करताना फुले बदल्यांमध्ये ठेवून शीतकरण केले जाते. इतर पद्धतीत फुले छिद्रयुक्त खोक्यात पॅक करून त्यावर थंड खोलीत ठेंद हवा जाऊ देतात. तापमान साधारण १.५ ते ४.७ डिग्री सें. ठेवले जाते, आणि फुलांच्या जातीनुसार थंड करण्याचा कालावधी बदलत असतो.

कोल्ड स्टोरेज: प्रीकुलींग नंतर फुलांचे तापमान कमी झालेले असते. या फुलांना हवामानानुसार इजा होऊ नये याकरिता फुले कोल्ड स्टोरेज मध्ये ठेवली जातात. फुलांच्या साठवणुकीची क्षमता हि मुख्यत: फुलोऱ्याची गुणवत्ता व फुलांच्या जातींवर अवलंबून असते. कट रोझेस जास्ती जास्त ३ ते ४ साठविता येतात.

डीलीफिंग( पाने काढण्याची पक्रिया):

प्रत्येक फुलाला दांडी असते आणि त्यावर असतात पाने. जर काढणी नंतर फुलांची तळाकडील पाने काढली जातात. यानंतर हे फुलांचे दांडे ब्लिचिंग पावडर किंवा सायट्रिक अॅसिड च्या द्रावणात बुडवून ठेवले जातात. यामुळे पाण्याचा पी एच कमी होतो आणि फुलांचे पाणी शोषून घेण्याचे प्रमाण वाढते.

प्रतवारी:

कुलिंगनंतरही दांडे वातानुकुलीत प्त्रावारीच्या खोलीत नेली जातात. यात दोषयुक्त, डागयुक्त खोड, त्यावरील कीड व रोगाप्रमाणे यंत्राद्वारे विविध गटात प्रतवारी केली जाते.

बंचिंग(गड्डा बांधणे):

यामध्ये फुलांच्या गड्ड्या  बांधल्या जातात. गड्डी  बांधण्याचे दोन प्रकार आहेत.

अ) वरखाली कळ्या गड्डी: याअंतर्गत कळ्यांचा एकमेकावर पडणारा दबाव टाळण्यासाठी दोन वेगळ्या स्तरांमध्ये गड्ड्या बांधतात.

ब) एकस्तरीय कळ्या पद्धत: या प्रकारात सर्व काळ्या एकाच स्तरात ठेवतात. छोटी देठे व लहान आकाराच्या कळ्यांच्या जातींमध्ये हि पद्धत वापरतात.

फुलांची वाहतूक:

काढणी करून झालेली फुले बाजारात नेण्यासाठी हा महत्वाचा टप्पा आहे. यासाठी प्रतवारी करून बंचिंग करून झालेली फुले योग्य पद्धतीने पॅक केली जातात. फुलांची वाहतूक करण्यासाठी कोणता पर्याय आहे यावर पॅकिंगची पद्धती ठरली जाते. पद्धत कोणतीही असली तरी फुलांना इजा न होता ग्राहकांपर्यंत फुले चांगल्या स्थितीत पोहोचतील याची काळजी घेतली जाते. कोणत्या खोक्यात कोणती फुले आहेत हे कळावे यासाठी खोक्यावर त्याची नोंद केली जाते.

Related posts

Shares