Search

गुपित डाळींब लागवडीचे…भाग १

गुपित डाळींब लागवडीचे…भाग १

डाळींबाचा इतिहास :

प्रत्येक गोष्टीला इतिहास असतो. असं म्हणतात कि हवा, पक्षी, प्रकाश यांना सीमांचे बंधन नसते. ते मैलोन मैल प्रवास करतात. खाण्याच्या काही पदार्थांचेही असेच आहे. फळांच्या बाबतीतही नेमके असेच आहे. आज  आवडीने खात असलेली अनेक फळे परदेशातून इथे आली आहेत. मात्र, आज त्या फळांची आपल्या इथे मोठ्या प्रमाणात लागवड होते आहे. फळांच्या संदर्भातील हा इतिहास खूपच रंजक आहे.  फळांचा इतिहास अभ्यासला असता, डाळींबाचे मूळ स्थान इराण समजले जाते. त्याची लागवड स्पेन, इजिप्त, अफगाणिस्तान, पाकिस्तान, ब्रहमदेश, चीन, जपान, अमेरिका व भारत या देशांमध्ये केली जाते. अफगाणिस्तानातील कंदहार हे डाळींबाचे आगार मानले जाते.

महाराष्ट्र आणि डाळिंब:

अवर्षण प्रवण भागामध्‍ये हलक्‍या जमिनीत व कमी  पावसावर तग धरणारे हे झाड आहे. त्‍यामुळे या पिकाच्‍या लागवडीखालील क्षेत्रात मोठी वाढ होत आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत विचार करावयाचा झाल्यास डाळिंब पिकांची लागवड अहमदनगर, पुणे, सांगली, सोलापूर, वाशिम या जिल्ह्यांबरोबरच इतर जिल्‍हयातही डाळींबाची मोठया प्रमाणावर लागवड केली जाते. सद्यस्थितीत महाराष्‍ट्रामध्‍ये डाळिंब पिकाखाली साधारण ७३०२७  हेक्‍टर क्षेत्र असून त्‍यापैकी सुमारे ४१००० हेक्‍टर क्षेत्र उत्‍पादनाखाली आहे.

बहुगुणकारी डाळींब:

 • डाळींबाचे फळ हे बहुगुणकारी आहे. डाळींब खाण्यासाठी तसेच औषधीसाठीही वापरले जाते.
 • डाळींबाच्‍या रसात साखरेचे प्रमाण १० ते १६ टक्‍के असते. ही साखर पचनास हलकी असते.
 • क़ुष्‍टरोगावर डाळींबाचा रस गुणकारी आहे.
 • त्‍याचप्रमाणे फळांची साल अमांश व अतिसार या रोगांवर गुणकारी आहे.
 • डाळींबाचा रस व खडीसाखर एकत्र करून घेतल्यास पित्त कमी होते.
 • अपचन दूर होते आणि त्यामुळे निर्माण झालेला शौचाचा विकार बरा होतो.
 • काविळीवरही हे एक चांगले औषध आहे.
 • हृदयविकारामुळे छातीत दुखत असल्यास डाळींबाचा रस उपयोगी पडतो.
 • डाळींबाचा रस, मध, साखर यांचे चाटण लहान मुलांचा खोकला बरे करते. फार बोलण्याने आवाज बसला असल्यास तो सुधारतो.
 • कापड रंगविण्‍यासाठीसुध्‍दा फळांच्‍या सालीचा उपयोग केला जातो.

डाळींबाच्या प्रमुख जाती :

 • भारतात डाळींबाचे निरनिराळे प्रकार लागवडीखाली असून त्याच्या फळांचे आकारमान,रंग,गुणवत्ता, बियांचा मऊपणा, चव,दाण्यांचा रंग इत्यादी मध्ये खूपच विविधता आढळते.
 • आळंदी, मस्कलरेड, काबूल, कंधारी, गणेश, १३७, भगवा/शेंद्री, आरक्ता, मृदूला सिडलेस या जाती असून आज महाराष्ट्रात भगवा / शेंद्री या जातीची सर्वाधिक लागवड आढळून येते.
 • त्यापाठोपाठ गणेश, आरक्ता व मृदुला या जातीची लागवड उल्लेखनीय दिसते.

 

 

जमीन:

 • डाळिंबाचे पिक कोणत्‍याही जमिनीत घेण्‍यात येते. अगदी निकस, निकृष्‍ठ जमिनीपासून भारी, मध्‍यम काळी व सुपीक जमिन डाळींबाच्‍या लागवडीसाठी चांगली असते,
 • मात्र पाण्‍याचा चांगला निचरा होणारी गाळाची किंवा पोयटयाची जमिन निवडल्‍यास उत्‍पन्‍न चांगले मिळते.
 • त्‍याचप्रमाणे हलक्‍या, मुरमाड माळरान किंवा डोंगर उताराच्‍या जमिनीसुध्‍दा या पिकाला चालतात.
 • मात्र जमिनीत पाण्‍याचा निचरा होणे आवश्‍यक आहे. चुनखडी आणि थोडया विम्‍लतायुक्‍त (अल्‍कलाईन) जमिनीतही डाळिंबाचे पीक येऊ शकते.

हवामान:

 • डाळींबाचे पिकास थंड व कोरडे हवामान उपयुक्‍त आहे.
 • उन्‍हाळयातील कडक ऊन आणि कोरडी हवा तसेच हिवाळयातील कडक थंडी डाळिंबाच्‍या वाढीस योग्‍य असते. अशा हवामानात चांगल्‍या प्रतीची फळे तयार होतात परंतु अशा प्रकारच्‍या हवामानात जरी थोडा फार फरक झाला तरी सुध्‍दा डाळिंबाचे उत्‍पन्‍न चांगले येते.
 • फुले लागल्‍यापासून फळे होईपर्यंतच्‍या काळात भरपूर उन व कोरडे हवामान असल्‍यास चांगल्‍या प्रकारची गोड फळे तयार होतात. कमी पावसाच्‍या प्रदेशात जेथे थोडीफार ओलीताची सोय आहे तेथे डाळींबाच्‍या लागवडीस भरपूर वाव आहे.

डाळींबाची लागवड कशी करावी:

 • डाळिंब लागवडिकरिता निवडलेली जमिन उन्हाळयामध्ये २ ते ३ वेळेस उभी आडवी नांगरटी करुन कुळवून सपाट करावी.
 • भारी जमिनीत ५ × ५ मिटर अंतरावर लागवड करावी.
 • त्यासाठी ६0 × ६0 × ६0 सेमी आकाराचे खडडे खोदावे. प्रत्येपक खडयाशी तळाशी वाळलेला पालापाचोळयाचा १५ ते २० सेमी जाडीचा थर देऊन २० ते २५ किलो शेणखत किंवा कंपोस्टळ खत, १ किलो सिंगल सुपरफॉस्फेट यांच्याड मिश्रणाने जमिनी बरोबर भरुन घ्यातवेत.
 • सर्वसाधारणपणे पावसाळयात लागवड करावी.
 • डाळिंबाची तयार केलेली कलमे प्रत्ये क खडयात एक याप्रमाणे लागवड करावी.
 • कलमाच्याड आधारासाठी शेजारी काठी पुरुन आधार द्यावा. कलम लावल्यापनंतर त्यााच बेताचे पाणी द्यावे.
 • लागवडीनंतर सुरुवातीच्या‍ काळात आवश्यआकतेनुसार पाणी द्यावे.
 • ५×५ मीटर अंतराने प्रती हेक्टवरी ४00 झाडे लावावीत.

 

बहर धरणे:

डाळींब पिकाला योग्य नियाजन केल्यास वर्षभरात केव्हाही बहर धरतो, म्हणुन त्याला सदाबहार पीक म्हटले जाते. तरीही मुख्यतः तीन बहारात डाळींबाचे नियोजन करतो येते. १) मृग बहर, २) हस्त बहर, ३) आंबे बहर.

 • मृग बहरः पावसाळा सुरू झाल्यानंतर जो बहर धरला जातो, त्याला मृग बहर म्हणतात. हा मुख्यतः पावसाच्या पाण्यावर पोसला जातो. मृग बहर हा जिरायती व जिथे पाण्याची कमतरता असते तिथे मोठ्या प्रमाणात धरला जातो. ह्याचा कालावधी जून-जुलै किंवा पावसाच्या आगमनावर अवलंबून असतो. मृग बहरात डाळींब पिकावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळतो, म्हणून मृग बहरात बुरशीजन्य व विषाणूजन्य रोगांचे काटेकोर नियोजन करावे.
 • हस्त बहरः पावसाळा संपल्यानंतर जो बहर धरला जातो त्याला हस्त बहर म्हणतात. ज्या ठिकाणी अत्यंत मुरमाड व पाण्याचा जलद निचरा होणा-या जमिनी असतात, अशा ठिकाणी डाळींब झाडाला लवकर ताण बसुन हस्त बहर धरणे सोपे जाते. सप्टेंबर – आक्टोंबर महीन्यात हस्त बहर धरला जातो.
 • आंबे बहर: आंब्याबरोबर घेतल्या जाणा-या डाळींब बहराला आंबा बहर म्हणतात. हलक्या व मुरमाड जमिनीत तीनही बहर घेणे शक्य असते, कारण कमी कालावधीत अशा जमिनींना ताण बसु शकतो, परंतू ज्या जमिनी जाड व भरपूर दळ असणा-या असतात, अशा जमिनीत आंबा बहर चांगला पर्याय आहे.

पुढील भागात आपण डाळींबाची आंतरमशागत, किड व रोग व्यवस्थापन, काढणी व उत्पादन जाणुन घेऊया

Related posts

Shares