Search

रब्बी हंगाम जोमात…

रब्बी हंगाम जोमात…
[Total: 6    Average: 3/5]

rabbi-agriculture-activities

रब्बीची चाहूल लागली आहे, आणि आता रब्बीच नियोजन कसे करावे यासाठी बळीराजाच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. पिक कोणतेही असो, शेती करताना काही महत्वपूर्ण कामे करावी लागतात. हि शेतीची कामे नेमकी काय असतात? हि कशी करावी? आणि याचा काय फायदा होतो या संदर्भात माहिती देणारा हा लेख आहे. शेतीची कामे विविध टप्प्यात केली जातात. शेतीत करण्यात येणारे प्रत्येक काम एकमेकास पूरक असते. जर या कामांचे योग्य नियोजन केले आणि हि कामे काटेकोरपणे केली गेली तर याचा लाभ शेतकऱ्यांना निश्चित होऊ शकेल.

1. नांगरणी :

नांगरणी शेतीमधील अत्यंत महत्वाची क्रिया आहे. शेतीची मशागत म्हटली कि यात महत्वाची ठरते ती नांगरणी. नांगरणी विविध प्रकारे करता येते. पारंपारिक नांगराला बैल जुंपून नांगरणी केली जाते, त्याचप्रमाणे हल्ली बरेच ठिकाणी ट्रॅक्टर च्या मदतीने नांगरणी केली जाते. पारंपारिक पद्धतीने करण्यात येणारी नांगरणी कमी खर्चाची असली तरी तिला अधिक वेळ लागतो. नांगरणीमुळे माती उखरल्या जाते व खालची माती वर येते.जमिन पोकळ होते. त्याद्वारे पिकांच्या मुळांना फैलण्यास वाव मिळतो.पिक जोमाने वाढते. जमिनीचा पोत लक्षात घेऊन नांगराची निवड केली जाते. नांगराचे मुख्यत्वे तीन प्रकार असून यामध्ये हलका नांगर, मध्यम नांगर आणि भारी नांगर यांचा समावेश आहे. मध्यम नांगर विविध नांवाने ओळखले जातात.
१.सोलापूर नांगर.
२.पुणेरी नांगर.
३.भातशेतीतील नांगर.
४.चरोचर नांगर.
५.पंचमहाल नांगर.
६.धारवाडी हलका नांगर.

Photo contest

2. कुळवणी:

नांगरणीनंतरची हि प्रक्रिया आहे. पूर्वीचे पीक निघाल्यानंतर हराळी आणि लव्हाळा यासारख्या बहुवार्षिक व इतर तणांचा बंदोबस्त करण्यासाठी जमिनीची उभी- आडवी खोल नांगरट, ढेकळे फोडणे, कुळवणी करणे, तणांचे अवशेष गोळा करून जाळून नष्ट करणे इत्यादी उपाययोजना करण्यासाठी कुळवणी केली जाते. नांगरणी झाल्यानंतर माती अधिकाधिक भुसभुशीत करण्यासाठी कुळवणी केली जाते. यामध्ये कुळवाच्या सहाय्याने जामिन भुसभुशित करुन पेरणीसाठी योग्य केली जाते. अशाप्रकारे कुळवणी केली असता पेरणीसाठी व पाण्यासाठी योग्य नियोजन करता येऊ शकते. कुळवणी हि जमिनीच्या उतारास आडवी करावी.

3.पेरणी/लावणी:

पेरणी शेतीमधील सर्वात महत्वाचा टप्पा असुन बी पेरण्याच्या अनेक पारंपारिक व आधुनिक पद्धती आहेत.पेरणी यंत्रास जमिनीवर चालणाऱ्या चाकाद्वारा गती दिली जाते. अवजारांची वाहतूक सुलभ होण्यासाठी यंत्रास दोन चाके दिलेली आहेत, तसेच या चाकांद्वारा पेरणीची खोली कमी-जास्त करता येते. या पेरणी यंत्राची कार्यक्षमता तीन ते पाच एकर पर्यंत असू शकते. पेरणीसाठी बियाणे दर्जेदार निवडावे व विद्यापीठाच्या शिफारशीनुसार प्रती एकर बियाण्याच्या दरानुसारच पेरणी करावी. बी पेरताना आधुनिक पेरणीयंत्राचा वापर करुन दोन रोपातील व ओळीतील अंतर विद्यापिठाच्या शिफारशीनुसार असल्यास पिक चांगले येते. पेरणी केल्यानंतर बी मातीखाली झाकणे महत्त्वाचे आहे. अन्यथा उघडे पडलेले बी पक्षी खाऊन टाकतात किंवा ते रूजत नाही व वाया जाते.

4.कोळपणी/निंदणी:

पिकातील तण नियंत्रणासाठी पेरणी झाल्यानंतर तीन , सहा , व नऊ आठवड्यांनी कोळपे या अवजाराच्या सहाय्याने शेतीची कोळपणी केली जाते. तणांमुळे ३५-७० टक्क्यांपर्यंत घट येऊ शकते. ही उत्पादनातील घट तणांचा प्रकार, तणांची घनता व तणनियंत्रणाचा कालावधी यांवर अवलंबून असते. पिकाव्यतिरिक्त अनावश्यक वनस्पती शेतात रुजुन पिकांसोबत ऊन, पाणी व अन्नद्रव्यांसाठी पिकांसोबत स्पर्धा करुन पिक उत्पादनात घट होते. पीक उगवणीपूर्वी तणनाशकाच्या जोडीला पेरणी नंतर सहा आठवड्यांनी एक खुरपणी व कोळपणी करावी जेणेकरून एकात्मिकरीत्या तणनियंत्रण साधले जाते.

5.विरळणी:

पेरणीच्या वेळी बियाण्याचे दोन-तीन दाणे टाकले तरी नंतर मात्र एका ठिकाणी एकच बियाणे ठेवून विरळणी करावी. दोन रोपातील व ओळीतील अंतर समान ठेवुन अधिक रुजलेली रोपे कमी काढुन टाकावी, जेणे करुन त्यांच्यातील स्पर्धा कमी होऊन आंतरमशागतही सोयिस्कर होईल. विरळणी ही साधारणतः चार आठवड्यांनी करावी.

6.जलसिंचन:

पावसाच्या पाण्याव्यतिरिक्त पिकांना अतिरिक्त पाणी दिले जाते त्यास जलसिंचन असे म्हणतात. इतर ॠतूतही पीके घेता यावीत, वर्षातून एकापेक्षा जास्त पीके घेणे,ननगदी पीके घेणे, दर हेक्टरी जास्त उत्पादन घेणे, पिकांना गरजेनुसार पाणी पुरवठा होणे म्हणुन जलसिंचन आवश्यक आहे. पारंपारिक व आधुनिक सिंचन असे दोन मुख्य भाग पडत असुन आधुनिक पद्धतीमध्ये सुक्ष्म सिंचनचा वापर केला जातो. सुक्ष्म सिंचन पद्धतीमध्ये ठिबक व तुषार सिंचन असे दोन प्रकार आहेत व या पद्धतींपासुन ३० ते ५०% पाणी कमी लागते.

पुढील भागात आपण रब्बी हंगामात शेतीमध्ये करावयाच्या उर्वरित महत्वाच्या कामांचा आढावा घेऊ.

Related posts

Shares