Search

मराठवाडा, विदर्भात पाऊस जोमात…

मराठवाडा, विदर्भात पाऊस जोमात…
[Total: 0    Average: 0/5]

महाराष्ट्रात पाणी टंचाई दिवसेंदिवस  बिकट होत चालली आहे.  याला  कारण ठरला आहे.  पाऊस… यंदा पाऊस दरवर्षीच्या तुलनेत कमी झाला असल्याच बोललं जात आहे. आतापर्यंत मान्सून मध्ये कोकणासह महाराष्ट्रात किनारपट्टीच्या भागात पाऊस चांगला झाला असला तरी तुलनात्मक दृष्ट्या  पावसाची सरासरी कमी आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात पावसाची कामगिरी निराशजनक आहे. सखोल निरीक्षण केल्यास मराठवाड्यात ५०%, मध्य महाराष्ट्रात ४०% पाऊस पडला आहे.

आता पाहायला गेलं तर मान्सून चा जोम ओसरला आहे असे म्हणता येईल. पाऊस कमी झाला असल्याने शेतकऱ्यांना समस्यांचा सामना करावा लागतो आहे. पावसाभावी पेरणी गेल्यानं चिंतेत असलेल्या शेतकऱ्याला आता जनावरांना चारा कसा उपलब्ध करून द्यावा या चिंतेन बेजार केलं आहे. या सगळ्या चिंता कमी होत्या कि काय म्हणून आता दुष्काळ सदृश परिस्थितीत पिण्याच्या पाण्याची कमतरता भीषण रूप धारण करते आहे. नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या साधारण ८००० गावांमध्ये दुष्काळ असल्याची घोषणा केली आहे. हा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. शहरी भागात पाणी कपात, गावात दुष्काळ जणू काही निसर्गाने महाराष्ट्राकडे पाठ फिरवल्याच विदारक  नजरेसमोर येत होत, चिंता वाढत होती.

या चिंतेत सप्टेंबर महिन्याला सुरुवात झाली. मात्र, परतीच्या वाटेवर असताना मान्सून नव्या जोमाने सक्रिय झाला आहे. चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहणाऱ्या सर्वसामान्यांना यामुळे दिलासा मिळाला आहे. विशेषकरून मराठवाडा आणि विदर्भातील पावसाची हजेरी सुखावह आहे. लक्ष्यद्वीप जवळ कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे हा बदल झाला आहे. यामुळे, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. याचा फायदा दुबार पेरणी केलेल्या पिकांना  होणारच आहे. पण, सगळ्यात महत्वाचे म्हणजे हा पाऊस रबी हंगामातील शेतीसाठी पोषक ठरणार आहे. महाराष्ट्राच्या किनारपट्टीला एक चक्रवाती हवेचे अभिसरनाचे क्षेत्र तयार होणार असल्याने या भागात चांगला पाऊस होईल. तसेच बंगालच्या उपसागरात तयार होणारी मान्सूनची प्रणाली हि जमिनीकडे सरकत असल्याने या भागात चांगला पाऊस होणे अपेक्षित आहे. सध्या सर्वात जास्त पावसाची कमतरता असलेले मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात येता आठवडाभर चांगला पाऊस होईल आणि त्यामुळे पावसाची उणीव भरून निघण्यास मदत होईल. सध्या होणारा पाऊस हा असलेल्या पिकांसाठी हितकारक आहे तसेच पुढच्या पेरणी साठीही चांगला ठरणार आहे. लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात अशा प्रकारे वरून राजा कृपादृष्टी दाखवण्याची शक्यता वर्तविली जात आहे. म्हणूनच, पावसाचे हे आगमन सुखावह ठरले आहे.

Related posts

Shares