Search

विदर्भातील आणि मराठवाड्यातील कोरडेपणा लवकरच संपुष्टात येण्याची शक्यता…

विदर्भातील आणि मराठवाड्यातील कोरडेपणा लवकरच संपुष्टात येण्याची शक्यता…

विदर्भ आणि मराठवाड्यात असलेला बिनपावसाचा काळ आता लवकरच संपुष्टात येण्याची शक्यता आहे. आणि याचे महत्वाचे कारण म्हणजे सध्या झारखंड आणि उत्तर छत्तीसगडवर कमी दाबाचे क्षेत्र आहे. हि हवामान प्रणाली पश्चिमेकडे सरकत असून त्याचा प्रभाव विदर्भ आणि मराठवाड्यावर लवकरच दिसून येईल अशी शक्यता वर्तविली जात आहे.
या मान्सून पर्वात मध्य भारतात चांगलाच पाऊस झालेला आहे. आणि महाराष्ट्रातील बऱ्याच भागातही चांगला पाऊस झालेला आहे तसेच ३० जून पर्यंत विदर्भात ५२ % जास्त पावसाची नोंद झाली होती आणि मराठवाड्यात सामान्य पातळीजवळ म्हणजेच १७% कमी पावसाची नोंद झाली होती.

विदर्भातील हवामान
जून महिन्यात संपूर्ण महिनाभर चांगला पाऊस झाला पण जुलै महिन्यात मात्र अपुराच पाऊस झाला. अगदीच केंव्हातरी नागपूर, वाशीम आणि चंद्रपूर येथे मान्सूनचा पाऊस झाला. परंतु हा पाऊस मान्सूनची नेहमीची पातळी गाठण्यासाठी फारच तोकडा होता. २ ऑगस्ट पर्यंत विदर्भाची पावसाची तुट २२% झाली आहे.
या आधीच सांगितल्यानुसार सध्या झारखंड आणि उत्तर छत्तीसगड यावर एक चांगले कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून ते लवकरच पश्चिमेकडे सरकेल असा अंदाज आहे. ४ व ५ ऑगस्टला त्यामुळे मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होईल
मराठवाड्यातील हवामान
मराठवाड्यातील परिस्थिती अजूनही तशी फारशी चांगली नाही. २ ऑगस्ट पर्यंत येथील पावसाची तुट ५०% झाली आहे. मध्य भारतावर असलेल्या हवामान प्रणालीमुळे या भागात ४ ऑगस्टला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणे अपेक्षित आहे. मराठवाडा गेल्या काही दिवसांपासून पूर्णपणे कोरडाच आहे. आता येणाऱ्या पावसाची तीव्रता विदार्भाइतकी नसली तरी या पावसामुळे थोडासा दिलासा नक्कीच मिळेल.
हिंगोली, जालना, परभणी, औरंगाबाद आणि नांदेड या शहरात मान्सूनचा चांगला पाऊस होईल. तसेच बीड, लातूर आणि उस्मानाबाद येथे हलका व तुरळक स्वरूपाचा पाऊस होईल असा अंदाज आहे.
७ ऑगस्ट नंतर विदर्भात हलक्या स्वरूपाचा पाऊस होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. विदर्भातील शेतकऱ्यांसाठी हि गोष्ट आनंददायी आहे.

संदर्भ : स्काय मेट

Related posts

Shares