Search

बजरंगी भाई (सलमान खान) बनणार संकट मोचक

बजरंगी भाई (सलमान खान) बनणार संकट मोचक

सलमान खान बॉलिवूड मधील हा सुपर स्टार त्याच्या चित्रपटांप्रमाणेच त्याच्या विविध उपक्रमांमुळे सद्देव चर्चेत राहतो. नुकताच त्याचा ’बजरंगी भाईजान’ हा चित्रपट प्रसिद्ध झाला.  या चित्रपटात सलमानने साकारलेल्या व्यक्तिरेखेचे खूप कौतुकही झाले. अनेकांनी हा सलमानचा आत्तापर्यंतचा उत्तम सिनेमा असल्याचं  सांगितलं. बॉक्स ऑफिस वर या चित्रपटाने चांगला गल्ला जमा केला. याचा फायदा आता शेतकऱ्यांना व्हावा असं या चित्रपटाचे निर्माते निर्माता सलमान आणि सहनिर्माता आर. व्यंकटेश यांना वाटते आहे.

“रिल लाईफ” हिरो सलमान खान आता “रिअल लाइफ” मध्येहि समाजतील समस्या सोडविण्यासाठी उत्सुक असल्याचे दिसते आहे . यामुळेच आता सलमान बळीराजाच्या मदतीला धावून जाणार आहे. दुष्काळाच्या चिंतेने खचलेल्या, कर्जाच्या डोंगराखाली दबलेल्या आणि आत्महत्येचा मार्ग पत्करणार्‍या शेतकर्‍यांना सावरण्यासाठी ’बजरंगी भाईजान’च्या कमाईतील एक वाटा देण्याची तयारी निर्माता सलमान आणि सहनिर्माता आर. व्यंकटेश यांनी दाखवली आहे.  राज्य सरकारनं ’बजरंगी भाईजान’ टॅक्स फ्री केला, तर त्यातून निर्मात्यांचा जेवढा फायदा होईल, ती संपूर्ण रक्कम शेतकर्‍यांच्या हितासाठी दिली जाईल, असे वचन सलमान खानने दिले आहे. भाजप नेत्या शायना एनसी यांच्यासोबत सल्लूची बहीण अल्विरा आणि कबीर खान यांनी अलीकडेच महसूलमंत्री एकनाथ खडसे यांची भेट घेतली.

Related posts

Shares