Search

पिकांच्या सर्वांगिण वाढीसाठी : समुद्री शेवाळी अर्क

पिकांच्या सर्वांगिण वाढीसाठी : समुद्री शेवाळी अर्क

रासायनिक खते व किडनाशकांशिवाय पिक उत्पादन वाढुच शकत नाही, त्याला काही दुसरा पर्यायच नाही” अशी वाक्य बहुधा अनेक शेतक-यांकडुन ऐकतो. पण हा गैरसमज आता दुर होत चालला आहे. आधुनिक शेतीमध्ये कालांतराने अनेक बदल होत गेले ज्या प्रमाणे रासायनिक उत्पादनांमध्ये अनेक रसायने विकसित झाली त्याचप्रमाणे अशीच क्रांती सेंद्रीय शेतीपद्धतीमध्ये झाली. त्यामध्येच समुद्री शेवाळी अर्क हे सेंद्रिय शेतीसाठी संजिवनीच ठरली आहे.पिकाच्या सर्वांगिण वाढीमध्ये विकास करण्यासाठी व उत्पादन वाढविण्यासाठी समुद्री शेवाळाचा वापर प्रत्येक शेतक-याने केलाच पाहिजे.

seaweed12seaweedd

समुद्री शेवाळी अर्क म्हणजे काय?

समुद्रीशेवाळी अर्क म्हणजेच समुद्रात वाढणा-या काही उपयुक्त वनस्पतींचा अर्क काढुन तो पिकांच्या वाढीसाठी वापरणे होय.

seaweed

समुद्री शेवाळी अर्कातील आवश्यक घटक:

समुद्री शेवाळी अर्कात अनेक पिकांच्या वाढीसाठी लागणारे आवश्यक मुख्य व सुक्ष्म अन्नद्रव्ये असतात. त्याच बरोबर अनेक आवश्यक आम्ले, जीवनसत्वे, संजिवके म्हणजेच ऑक्सिन्स, जिबरेलिन्स, अँन्टीबायोटीक्स हे सर्व पिकांना आवश्यक असणारे घटक समाविष्ट आहेत.

समुद्री शेवाळी अर्क : भुसुधारक

 • समुद्री शेवाळी अर्कामधील आवश्यक आम्ले भुसुधारकाचे कार्य करतात. ह्या आम्लामधील अल्जीनिक ॲसिड पाण्याची जलधारण क्षमता वाढविण्याचे कार्य करते.
 • याच आम्लांमुळे अतिवृष्टी भागातही मातीतुन आवश्यक अन्नद्रव्ये वाहुन जाण्यास आळा बसतो व माती सुपिक रहाते.
 • प्रयोगानुसार असे सिद्ध झाले आहे कि समुद्र शेवाळी अर्कामुळे ११% पेक्षा जास्त मातीची जलधारण क्षमता सुधारते.
 • याच आम्लामुळे मातीची प्रत सुधारते व हवा खेळती रहाण्यास मदत होते.
 • त्याच बरोबर समुद्री शेवाळी अर्कामुळे मातीतील सुक्ष्मजीवांच्या संख्येत प्रकार्षाने वाढ होते.याच सुक्ष्मजीवांचा उपयोग हवेतील आवश्यक अन्नद्रव्ये मातीत स्थिर करण्यास होतो.
 • समुद्री शेवाळी अर्क सुक्ष्म जीवाणुंचे व जैविक घटकांचे अतिशय लहान भागात रुपांतर करते व या जैविक घटकांचे विघटन जलद गतिने होण्यास उपयुक्त ठरते.
 • या बरोबरच अल्कलीयुक्त मातीचा सामु स्थिर करण्यासाठी देखिल हे उपयोगी आहे.

 

समुद्री शेवाळी अर्क : आवश्यक पिक संजिवक

 • समुद्री शेवाळी अर्क बियाण्यावर वापरल्यास बियाणांची उगवण क्षमता हि जलद होते.
 • पिकांची अन्नद्रव्ये शोषून घेण्याच्या क्षमताही वाढवण्याचे कार्य समुद्री शेवाळी अर्क करते.
 • आवश्यक अन्नद्रव्यांबरोबरच समुद्री शेवाळी अर्कामध्ये अनेक प्रकारची जीवनसत्वे मुबलक प्रमाणात असतात त्यापासुन पिकांना “संयुक्त बी” बरोबरच “ई” आणि “के” जीवनसत्त्वे हि उपलब्ध होतात.हि जीवनसत्त्वे पिकांचे जलदगतीने वाढ करतात.
 • हयामधील ऑक्सीनमुळे पिकातील पेशी विभाजन जलदगतीने होते. व याचाच परिणाम म्हणुन फांद्या व मुळ्यांची वाढ जलद गतीने होते.

समुद्री शेवाळी अर्क : आवश्यक सुक्ष्म अन्नद्रव्य

 • सुक्ष्म अन्नद्रव्यांचा भरणा असणा-या समुद्री शेवाळी अर्कामध्ये लोह, कोबाल्ट तांबे, मॅगनीज आणि झिंक या सर्वांचे मुबलक प्रमाण असते.
 • समुद्री शेवाळी अर्क पाण्यावर फवारले असता पानांची जैवरासायनिक प्रणाली सुधारुन प्रकाश संश्लेषण प्रक्रिया जलद होते.

समुद्री शेवाळी अर्क : एक पिक संरक्षक

 • प्रयोगान्ति असे निदर्शनात आले आहे कि, ज्या पिकांवर समुद्रीशेवाळी अर्क वापरला ती पिके अधिक प्रमाणात रोग व किड प्रतिकारक्षम जाणवली.
 • त्यामध्ये लाल कोळी, पिठ्या ढेकुण, पांढरी माशी या किडीच्या नियंत्रणासाठी उपयोगी असुन त्याच बरोबर सर्व प्रकारच्या बुरशीच्या नियंत्रणासाठीही समुद्री शेवाळी अर्क उपयुक्त आहे.

बाजारात उपलब्ध असलेले समुद्री शेवाळी अर्क व त्यांची नावे:

अनु. क्र. समुद्री शेवाळी अर्काचे नाव

 

उत्पादक कंपनीचे नाव
उन्नती गोल्ड महिंद्रा
जिंगो महिंद्रा
समुद्रा महिंद्रा
वंडर ५ स्वरुप एग्रो
नर्सरी प्लस आस्था बायो केअर
बायो केल्प वाय.के.लॅब्स
ब्लीप अंजली बायो टेक

 

आपल्याला समुद्री शेवाळी अर्कासंबंधी अधिक माहिती पाहिजे असल्यास www.destamart.com ला भेट द्या किंवा ७७७५००११८८ / ८६५५४४०३३० या क्रमांकावर संपर्क करावा.

Related posts

Shares