Search

अत्यंत कमी खर्चात सुरु करता येणारा रेशीम उद्योग…

अत्यंत कमी खर्चात सुरु करता येणारा रेशीम उद्योग…
[Total: 7    Average: 3.7/5]

रेशमाच्या वस्त्राची मागणी भारतात नेहमीच राहिली आहे. अगदी इतिहासाची पाने चाळली तरी आपल्याला रेशमी वस्त्रांचा संदर्भ सहज आढळतो. पूर्वीच्या राजा राजवाड्यांची वस्त्रे, त्यांच्या रेशमी अम्बाऱ्या इत्यादींचा उल्लेख आढळतो. भारतात महाराष्ट्र, राजस्थान, काश्मीर, उत्तर प्रदेश, आसाम, हिमाचल प्रदेश, गुजरात, दक्षिण भारत सगळीकडेच रेशमी वस्त्रे बनवली जातात. महाराष्ट्रात रेशमी धाग्यापासून बनविली जाणारी पैठणी जगप्रसिद्ध आहे, दक्षिण भारतात हि रेशमी धाग्यापासून कांजीवरम बरोबरच इतर रेशमी साड्या जगभरात निर्यात केल्या जातात. काश्मीर मध्ये रेशमी धाग्यापासून तयार वस्त्रांवर केली जाणारे काश्मिरी भरतकाम हे नेहमीच  आकर्षित करत आले आहे. एकूणच, पाहायला गेलं तर संपूर्ण भारतात रेशीम उद्योग कमी अधिक प्रमाणात होत आहे.

जगात रेशीमास असलेली मागणी, महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती आणि रेशीम उद्योगास असलेले अनुकूल हवामान लक्षात घेता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आपल्या अर्थिक समृद्धीसाठी रेशीम उद्योग हाती घेण्याची गरज आहे. महाराष्ट्रातील मध्यम व अल्पभूधारक शेतकऱ्यांना केवळ शेतीच्या व्यवसायावर आपल्या कुटुंबाचा वाढता प्रपंच चालविणे व चरितार्थ भागविणे दिवसेंदिवस कठीण होत आहे. दुग्ध व्यवसाय आणि कुक्कुट पालन व्यवसाय या सारखाच रेशीम शेती व्यवसाय हा शेतीस पूरक व्यवसाय आहे. हा व्यवसाय, अत्यंत कमी खर्चात व शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या साहित्यातून करता येतो. रेशीम उद्योग हा एक अत्यंत महत्त्वाचा शेतीवर आधारित कुटीरोद्योग असून त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर विकेंद्रित स्वरूपात रोजगार उपलब्ध करून देण्याची क्षमता आहे. किटकांपासून रेशीम मिळविण्याची कला माणसाला हजारो वर्षापासून अवगत आहे. रेशीम उद्योगाखाली मुख्यत: तुती, टसर, मुगा आणि एरंडी या चार प्रकारचे रेशीम उत्पादन होते. हे चार ही प्रकार आपल्या देशात तयार होतात.

रेशीम उद्योग हा पर्यावरणाचे प्रदूषण न करणारा असून या उद्यागातून निर्मिती केलेले कोष योग्य भावाने व हमी किंमतीत खरेदी करण्याची हमी खादी ग्रामोद्योग मंडळाने घेतल्यामुळे उत्पादन केलेल्या मालाला बाजारपेठ पाहण्याची मुळीच गरज नाही. याशिवाय रेशीम किडींचे संगोपन करीत असताना यावर आधारित इतर दुय्यम परंतु काही अर्थाजन करून देणारे व्यवसाय करता येण्यासारखे आहेत. रेशीम किटकांची विष्ठा मासळ्यांसाठी व बागेसाठी चांगल्याप्रकारचे खत आहे.

 

तुतीची लागवड

तुतीची लागवड विविध हवामानाच्या आणि भू-स्थितीच्या विस्तृत क्षेत्रामध्ये केली जाउ शकते. रेशमाच्या कोशांच्या सफल उत्पन्नासाठी आवश्यक असलेले उच्च गुणवत्तायुक्त पानांचे पीक उत्तम पध्दतींचा वापर करून मिळविणे शक्य आहे.

रेशीम कीटकांचे पालन

रेशमाचा किडा आपल्या अंड्यातून बाहेर पडण्याच्या काळात पांच वेगवेगळ्या चरणांत विविध निर्मोचन (अंगावरील कांत टाकणे किवा पिसे टाकण्याची क्रिया) अवस्थांमधून जातो.  उत्कृष्ट प्रतीचे रेशीम मिळविण्यासाठी ह्या लार्व्हीकरणाच्या (अंड्यातून बाहेर पडलेला पण स्वत:भोवती अजून कोश न विणलेल्या अवस्थेत असणारा किडा) काळांत वेळेवर व काळजीपूर्वक व्यवस्था करणे आणि एका विशेषरीत्या तयार केलेल्या शेडमध्ये किड्यांची जोपासना करणे फार महत्वाचे आहे.

रेशीम उद्योगातून इतर फायदे –
1. रेशीम अळयांची विष्ठा दुभत्या जनावरांना सुग्रास प्रमाणे खाद्य म्हणून वापरता येते. यातून 1 ते दीड लिटर दूध वाढते.
2. वाळलेला पाला व विष्ठेचा गोबरगॅस मध्ये उपयोग करुन उत्तम प्रकारे गॅस मिळतो.
3. तुतीच्या वाळलेल्या इंधन म्हणून वापरता येतात. तसेच खत म्हणून सुध्दा वापरता येते.
4. संगोपनाक वापरलेल्या चोथा करुन त्यावर अळींबीची लागवड करता येते व त्यानंतर चोथ्यापासून गांडूळ खत करता येते.
5. रेशीम उद्योगापासून देशाला परकीय चलन मिळते व देशाच्या विकासात हातभार लागतो.
6. तुतीची दरवर्षी तळ छाटणी करावी लागते .या छाटणी पासून मिळणारी तुती कोश शासना मार्फत खरेदी केली जातात. त्यामुळे एकरी रु 3500/- ते 4500/- जास्तीचे उत्पन्न प्रतीवर्षी मिळते.
7. तुतीच्या पानांमध्ये व ये जीवनसत्वाचे प्रमाण बरेच आढळते. त्यामुळे तुतीचा पाला व रेशीम कोश प्युपा आर्युवेदीक दश्ष्टया महत्वाचा आहे.
8. विदेशात तुतीच्या पानांचा चहा मलबेरी टी करतात. शिवाय वाईन करतात.
9. कोश मेलेल्या प्युपाचा आयुर्वेदीक औषधे व सौंदर्य प्रसाधनात उपयोग करता येतो.

 

 

Related posts

Shares