Search

कीटकांचे प्रभावी नियंत्रण करणारा सोलर किटक सापळा

कीटकांचे प्रभावी नियंत्रण करणारा सोलर किटक सापळा

शेतातील कीड नियंत्रण हि अत्यंत महत्वाची आणि जोखमीची प्रकिया आहे. त्यासाठी कीटकनाशकांचा वापर करणे, काहीसे अनिवार्य असले तरीही कीटकनाशक खरेदी व फवारणी हि नेहमीच एक खर्चिक बाब ठरलेली आहे. तसेच कालांतराने किडींमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होऊन कीटकनाशकांचा प्रभाव कमी होत जातो. या सर्व समस्यांवर किसान एक्स कंपनीचा सोलर कीटक सापळा एक उत्तम पर्याय ठरू शकतो, ज्याचा वापर करून प्रभावी कीड नियंत्रण करणे शक्य आहे!

सोलर कीटक सापळ्याची प्रमुख वैशिष्ट्ये:

 • पूर्णतः ऑटोमॅटिक सापळा – अंधार पडल्यानंतर स्वतः चालू होतो, बॅटरीसुद्धा स्वतःहुन चार्ज होते
 • हवेतून प्रसार होणाऱ्या फुलकिडा, मावा, तुडतुडे अशा सर्व कीटकांचे नियंत्रण 
 • कीटकनाशक खरेदी आणि फवारणीच्या खर्चात मोठी बचत
 • सेंद्रिय शेतीसाठी व एकात्मिक कीटक नियंत्रणासाठी फायदेशीर
 • कोणत्याही मेंटेनन्सची गरज नाही
 • 1 सापळा 1 एकर क्षेत्र कवर करतो
 • फळबागा, भाजीपाला पिकांसाठी उपयोगी
 • पिकांच्या उंचीनुसार सोलर पॅनल व लाईटची उंची कमी-जास्त करता येते
 • सहा महिन्यांची गॅरंटी 

कीड नियंत्रणाची प्रक्रिया

सोलर कीटक सापळ्यामध्ये  निळ्या आणि पिवळ्या रंगाचे LED दिवे बसवलेले असतात. हे दिवे संध्याकाळी अंधार पडल्यानंतर स्वतःहुन पेटतात. 12 मिनिट पिवळे LED पेटतात तर पुढील 12 मिनिट निळे LED चालू होतात. अशा पद्धतीने सलग 4 तास हा कीटक सापळा चालतो व स्वतःहुन बंद होतो.

हवेतून प्रसार होणाऱ्या कीटकांचे नर सूर्यास्तानंतर सर्वात जास्त सक्रिय असतात. हे किडे सापळ्यातील LED दिव्यांकडे आकर्षित होतात आणि दिव्यांच्या खालील भांड्यात असलेल्या पाण्यात पडतात. त्यामुळे किडींचा नायनाट होऊन कीड नियंत्रण अधिक प्रभावी होते! 

या सापळ्यासाठी कोणत्याही मनुष्यबळाची व देखभालीची गरज नसते. त्यामुळे कीटकनाशकांच्या तसेच फवारणीसाठी लागणाऱ्या मजुरीच्या खर्चात मोठी बचत होते.

टेक्निकल माहिती:

 • अल्ट्रा व्हायोलेट वेव्हलेन्थ युक्त LED बल्ब
 • पावडर कोटेड बॉडी
 • 6 V, 4.6 Ah बॅटरी
 • जास्तीत-जास्त उंची 10 फूट 


सोलर कीटक सापळ्याची खरेदी व अधिक माहितीसाठी खालील फॉर्म भरा

जिल्हा:

व्यवसाय:

Related posts

Shares