Search

पुढील पाच वर्षात राज्यसरकार कृषी क्षेत्रात २५,००० करोड गुंतवणार – मुख्यमंत्र्यांची घोषणा

पुढील पाच वर्षात राज्यसरकार कृषी क्षेत्रात २५,००० करोड गुंतवणार – मुख्यमंत्र्यांची घोषणा
[Total: 0    Average: 0/5]

महाराष्ट्रातील शेतकरी कर्जाच्या डोंगराखाली बुडाल्याची चर्चा गेले अनेक दिवस जोर पकडते आहे. यावर विरोधकांनीही कंबर कसली आहे. कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून विरोधक सरकारला घेरण्याच्या बेतात आहेत. राज्य सरकारने कर्जबाजारी शेतकऱ्यांचे कर्ज माफ करून त्यांना मदत करावी अशाप्रकारच्या सूचना केल्या जात आहेत. पण. अशाप्रकारे कर्ज माफी करण्यापेक्षा राज्यसरकार शेतकऱ्यांच्या हिताचा विचार लक्षात घेऊन आगामी काळात विविध योजनांमध्ये गुंतवणूक करेल अशी घोषणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

शेतकऱ्यांवरील कर्जाचा विचार करता कर्जाची रक्कम साधारणता रु. २४,००० करोड इतकी आहे. याबाबत बोलताना श्री. देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफी करण्यापेक्षा शेती आणि शेतकऱ्यांचा विकास व्हावा यासाठी  राज्यसरकार पुढील पाच वर्षात रु. २५,००० करोड ची गुंतवणूक कृषी क्षेत्रात करेल अशी घोषणा केली आहे. याअंतर्गत कृषीसाठी अधिकाधिक प्रमाणात पाणी उपलब्ध व्हावे यासाठी महत्वाकांक्षी योजनांचा विचार केला जाईल. याशिवाय, शेतकऱ्यांपर्यंत सहजरीत्या वीज उपलब्ध व्हावी यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर दिला जाईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

अधिक माहिती : http://www.livemint.com/Opinion/

Related posts

Shares