Search

बहुविध पिकातुन साधली समृद्धी

बहुविध पिकातुन साधली समृद्धी

अनियमित पाऊस, पाण्याची कमतरता, अचानक होणारा किड आणि रोगांचा हल्ला अशा अनेक अडचणी विदर्भातील शेतक-यावर उद्भवतात. विदर्भात शक्यतो कापुस हे मुख्य पिक असुन त्यापाठोपाठ संत्रा,मोसंबी, सोयाबीन, ज्वारी, केळी इ. पिके घेतली जातात. हि सर्व पिके किडी व रोगांना सहज बळी पडणारी असल्यामुळे नेहमीच शेतक-याला जोखिम पत्करावा लागतो. तसेच बाजारभावाची शाश्वतीही मिळणे कठीण.

 

यावर पर्याय म्हणुन लाडकी बुद्रुक गावातील मुळशी तालुका, अमरावती येथील सतिश बुरंगे या शेतक-याने बहुविध पिक लागवड पद्धतीची कांस धरली आहे. वर्षातुन दोन पेक्षा अधिक पिके घेण्यास त्यांनी सुरुवात केली पारंपारिक पिकपद्धतींवर अवलंबुन न रहाता नवनविन पिकांची लागवड केली. सद्यस्थितीत सतिशजींच्या शेतावर संत्र, मोसंबी, केळी, कापुस, सोयाबीन हि पिके असुन त्याच बरोबर आले, हळद, कोहळा या पिकांची लागवड करण्यात आली आहे. सतिशजींच्या ४५ एकर जमिनीत वरिल सर्व पिके घेतली जात असुन बाजारपेठेच्या आवश्यकतेप्रमाणे त्यांनी लागवडीखालील क्षेत्र किती असावे? हे ठरवले आहे.

प्रथमच मुळशी तालुक्यात सतिशजींनी ४ एकरवर आले व हळदीची लागवड केली असुन प्रती एकरी १२५ क्विंटल उत्पादन येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्याबरोबरच कोहळा उत्पादनाचा प्रयोग त्यांनी केला असुन असा प्रयोग या भागामध्ये करणारे  हे पहिले शेतकरी आहेत. कोहळ्याचे पिक आता उत्तम स्थितीत असुन फळधारणा अवस्थेत आहे. लागवडीपुर्वीच कोहळ्याच्या विक्रीची व्यवस्था केली असुन या पिकाला बाजारपेठेमध्ये पेठा बनविण्यासाठी विशेष मागणी असल्याचे त्यांनी सांगितले. कोहळा या पिकाला भावही चांगला असुन उत्पादन खर्च हि इतर पिकांच्या तुलनेत कमी असतो.IMG-20150916-WA0011

सतिश बुरंगे यांच्या शेतीचे वैशिष्ट्ये म्हणजे पिकाचे सुयोग्य नियोजन आणि काटेकोर निरिक्षण. सतिशजी सांगतात पिकाला ज्याची आवश्यकता असते ते पिक स्वतः आपल्याला सांगत असते, आपणल्याला करायचे असते ते योग्य निरिक्षण व व व्यवस्थित निरिक्षण करुन मिळणा-या अनुमानावरुनच आवश्यक ती उपाययोजना करावी. ह्याचाच परिणाम म्हणुन कापुस उत्पादनातील यशस्वी शेतकरी म्हणुन त्यांची ओळख आहे. २००८ साली २९ क्विंटल प्रति एकरी त्यांनी उत्पादन घेतले असुन मॉन्सेन्टो कंपनीनेसुद्धा त्यांचे प्रक्षेत्र सलग तीन वर्ष जाहिरातींसाठी वापरले होते.

IMG-20150916-WA0009

त्याचबरोबर ते सांगतात, पिकाची लागवड हि बाजरपेठ निहाय असावी, बाजारपेठेतील मागणी, किंमतीची हमी, एकापेक्षा जास्त विक्रेत्यांशी संवाद या सर्व गोष्टी लक्षात घेऊनच पिकांची निवड करावी, लागवडीपुर्वीच बाजारपेठ सुनिश्चित करावी असे त्यांचे मत आहे.

 

सध्या विदर्भातील प्रतिकुल परिस्थितवर मात करण्यासाठी पारंपारिक पिकांबरोबर अपारंपारिक पिकांचीही लागवड फायद्याची ठरेल यांत शंकाच नाही. हि पिके एकत्रीत घेतल्यास कोणत्याही एका पिकावर निर्भर न रहाता जोखिम हि कमी होतो व उत्पादनाचे विक्रीव्यवस्थापनही सुलभ करता येते. त्याच बरोबर जरी एका पिकातुन उत्पन्न मिळाले नाही तर दुस-या पिकापासुन आपण नफा मिळवु शकतो.  पिकांचा फेरपालट करुन जमिनीची सुपिकता हि कायम रहाते. एक नाही असे अनेक फायदे या पद्धतीत असले तरी या पिकांची शास्त्रोक्त माहीती असणे गरजेचे आहे. माती परिक्षण,हवामानाची अनुकुलता, पिकांचा लागवड कालावधी, त्याचे सरासरी उत्पादकता, त्यावरील किड व रोग व्यवस्थापन, पाण्याची आवश्यकता तसेच काढणीचा कालावधी या सर्व बाबींचा काटेकोर अभ्यास करुनच पिकांची निवड आणि लागवड करावी.

सतिश बुरंगे : मु.पो.लाडकी बुद्रुक गावातील तालुका मुळशी, जिल्हा : अमरावती

संपर्क :९९७५२२६८४२

 

(आपल्याकडेही शेती किंवा शेती अवजारांच्या संदर्भातील अशी यशोगाथा असेल तर आपण आमच्याशी संपर्क करा. ८०८२३४६५०९ किंवा ९८२०९७९१६६. या क्रमांकांवर आपण शेतीविषयक काही माहिती हवी असेल तरी निश्चित संपर्क करू शकता.)

Related posts

Shares