Search

फुलवा निशिगंधाचा मळा…

फुलवा निशिगंधाचा मळा…

१. प्रस्तावना:

 • महाराष्ट्रात गुलाब, निशिगंध, ग्लॅडिओलस, शेवंती तसेच मोगरावर्गीय फुले, झेंडू इत्यादी फुलांची लागवड होते.
 • सुगंधी फुलांसाठी प्रसिद्ध असलेली एक वनस्पती “निशिगंध” ही वनस्पती “अगेव्हेसी” कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव “पॉलिअँथस ट्युबरोझा” आहे.
 • निशिगंधाच्या लागवडीसाठी कंद वापरतात.
 • निशिगंध ही वनस्पती १-१.५ मी. उंच वाढते. खोड (कंद ) भूमिगत असते. मुळे फार खोलवर नसतात.
 • पाने साधी, तलवारीसारखी, जमिनीतून खोडापासून निघालेली व हिरवीगार असतात. फुले उंच दांड्याच्या टोकाला गुच्छाने येतात.
 • गुच्छात कळ्या वरच्या टोकाकडे असतात, तर उमललेली फुले खाली असतात.
 • फुले पांढरी, द्विलिंगी आणि सुवासिक असतात. ती ५-६ सेंमी. लांब, खालच्या बाजूस थोडी वाकलेली व नसराळ्यासारखी असतात. बोंडे (फळे) क्वचित आढळतात. बी सपाट असते.निशिगंधाच्या फुलांपासून सुगंधी अर्क काढतात. त्यापासून ‘रजनीगंधा’ हे अत्तर तयार करतात.
 • फुले हार व वेण्या करण्यासाठी तर फुलांचे दांडे वेगवेगळ्या पुष्परचना व गुच्छ करण्यासाठी वापरतात.
 • निशिगंधाच्या फुलांना वर्षभर चांगली मागणी असते.

 

२. हवामान :

 • निशिगंधाच्या पिकाला उष्ण आणि काही प्रमाणात दमट हवामान चांगले मानवते.
 • साधारणपणे २५ ते ३० डी. सेल्सिअस तापमान आणि ५० ते ५५% आर्द्रता असलेल्या भागात निशिगंधाची चाग्नाली वाढ होते आणि जास्त उत्पादन मिळते.
 • पिकाच्या चांगल्या जोमदार वाढीसाठी भरपूर स्वच्छ सुर्यप्रकाशाची आवश्यकता असते.
 • कडक उन्हात पाने गळणे , कळ्या सुकणे, फुले लवकर उमलणे असे प्रकार पिकावर होतात.
 • महाराष्ट्रातील बहुतेक सर्वच ठिकाणचे हवामान निशिगंधाच्या पिकाला चांगले आहे.

 

३. जमिन :

 • या फुलांचे चांगले उत्पादन घ्यायचे असेल तर निशिगंधाच्या लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी आणि भरपूर सेंद्रिय पदार्थ असलेली जमीन निवडावी.
 • उथळ आणि हलक्‍या जमिनीत फुलदांडे आणि फुले लहान राहतात आणि हंगामही लवकर संपतो.
 • भारी, काळ्या जमिनीत मर आणि कूज रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. चुनखडीयुक्त, हरळी आणि लव्हाळायुक्त जमिनीत निशिगंध लागवड करू नये.

४. लागवडीचे तंत्र

 • लागवड शक्‍यतो एप्रिल – मे महिन्यांत करावी.
 • निशिगंधाची अभिवृद्धी बियांपासून तसेच जमिनीत वाढणाऱ्या सुप्त कंदांपासून लागवड करतात.
 • लागवडीसाठी 20 ते 30 ग्रॅम वजनाचे कंद निवडावेत. कंद मागील वर्षीच्या पिकापासून निवडावेत.. निवडलेले कंद लागवडीपूर्वी 2 टक्का तीव्रतेच्या ताम्रयुक्त बुरशीनाशकात 15 मिनिटे बुडवून सावलीत वाळवावे. त्यानंतर लागवडीसाठी वापरावेत.
 • काढलेले निवडक कंद सावलीत दोन आठवडे पसरवून ठेवावेत. कंद निवडताना सारख्या आकाराचे 3 सें.मी. व्यासाचे, वजन साधारणपणे प्रत्येक 15 ग्रॅम असावे.

Tuberose tubour

 • लागवडीसाठी सरी-वरंबा अथवा सपाट वाफे पद्धतीने लागवड करावी, त्यापूर्वी निवडलेल्या जमिनीची उभी-आडवी खोल नांगरट करून कुळवाच्या पाळ्या घालून जमीन भुसभुशीत करावी.
 • हेक्‍टरी 40 ते 50 टन चांगले कुजलेले शेणखत मिसळावे. सरी, वरंब्यावर 30 सें.मी. बाय 30 सें.मी. अंतरावर कंदाची लागवड करावी.
 • वाफे शक्‍यतो तीन मीटर लांब आणि दोन मीटर रुंद आकाराचे करावेत.
  कंद जमिनीत पाच ते सात सें.मी. खोल पुरावा.
 • निमुळता भाग वरच्या बाजूस ठेवून मातीने झाकावेत आणि शेतात त्वरित पाणी द्यावे.
 • हेक्‍टरी साधारणपणे 60 ते 70 हजार कंद पुरेसे होतात.

 

५. जाती

 • फुले रजनी, शृंगार, प्रज्वल, सुवासीन आणि वैभव या सुधारित जातींचा वापर करावा.
 • सिंगल या प्रकारातील फुले पांढरीशुभ्र असून, अत्यंत सुवासिक असतात. या प्रकारामध्ये सिंगल, शृंगार, प्रज्वल या जाती आहेत. ही फुले हार, वेणी, गजरा, माळा यांसाठी वापरतात.
 • महात्मा फुले कृषी विद्यापीठाने फुले रजनी ही जात विकसित केली आहे. ही जात सुट्या फुलांच्या अधिक उत्पादनासाठी व कटफ्लॉवर म्हणून फुलदाणीत ठेवण्यासाठी चांगली आहे.
 • डबल प्रकारामध्ये स्थानिक डबल, सुवासिनी, वैभव या जाती आहेत.
 • या जातीची फुले फुलदाणीत ठेवण्यास योग्य असतात.
 • सेमी डबल या प्रकारच्या जातीची फुले फुलदाणीसाठी अथवा गुच्छ तयार करण्यासाठी वापरतात.
 • व्हेरिगेटेड प्रकारामध्ये सुवर्णरेखा व रजतरेखा या जाती आहेत. या जाती बागेत, कुंडीमध्ये शोभेसाठी लावण्यासाठी चांगल्या आहेत.

 

६. खते आणि पाणी व्यवस्थापन –

खते मात्रा प्रतिएकरी देण्याची वेळ
युरिया १७४ किलो लागवडीच्या वेळी – ५८ किलो
लागवडीनंतर ४५ दिवसांनी – ५८ किलो
सुपर फॉस्फेट ७५० किलो – लागवडीच्या वेळी
म्युरेट ऑफ पोटॅश १३२ किलो लागवडीच्या वेळी 
 • दहा किलो स्फुरद विरघळविणारे जिवाणूसंवर्धक आणि दहा किलो ट्रायकोडर्मा प्रत्येकी 100 किलो ओलसर शेणखतात मिसळून हे ढीग आठवडाभर प्लॅस्टिकच्या कागदाने झाकून ठेवावेत.
 • एका आठवड्यानंतर हे तिन्ही ढीग एकत्र करून हे खत एक हेक्‍टर पिकाला द्यावे.

 
७. पाणी व्यवस्थापन :

 • लागवडीनंतर लगेच पहिले पाणी व दुसरे पाच ते सात दिवसांनी द्यावे.
 • पावसाळ्यात पाऊस नसेल तर 10 ते 12 दिवसांनी, हिवाळ्यात आठ-दहा दिवसांनी, तर उन्हाळ्यात पाच ते सहा दिवसांनी, जमिनीच्या मगदुराप्रमाणे पाणी द्यावे.
 • फुलांचे दांडे सुरू झाल्यावर नियमित पाणी द्यावे. लागवड
 • केल्यापासून पहिल्या तीन-चार महिन्यांत वेळोवेळी तण काढून जमीन स्वच्छ व भुसभुशीत ठेवली, तर पिकाची वाढ जोमाने होते.

८. किड व्यवस्थापन:

निशिगंधास मावा, फुलकिडे व अळी या किडींचा व फुलदांड्याची कुज व पानांवरील ठिपक्या रोगांचा

 

अ.  क्र. कीटकनाशक / बुरशीनाशक पाण्यातील प्रमाण प्रती १० लिटर किडी / रोग
१. मोनोक्रोटोफॉस ३६% प्रवाहीफॉस्फोमिडॉन ८५% प्रवाही

डायमेथोएट ३०% प्रवाही

 १५ मिली१० मिली

१० मिली

मावा व फुलकिडे
२. एन्डोसल्फान ३५% प्रवाही २० मिली अळी
३. डायथेन एम-४५कार्बनडेझिम ५०%

पाण्यात विरघळणारी

पावडर

२० ग्रॅम

२० ग्रॅम

फुल- दांड्यातीलकुज व पानावरील

ठिपके

 

९. फुलांची काढणी – 

 • सप्टेंबर – ऑक्टोबर या काळात फुलांचा मुख्य हंगाम असतो.
 • निशिगंधाच्या कंदांच्या लागवडीनंतर ८० ते ९० दिवसांत फुलांचे दांडे दिसू लागतात.
 • लागवडीनंतर साधारणपणे १०० ते १२० दिवसांत फुले काढणींस सुरुवात होते.
 • यावेळी निशिगंधाच्या फुलदांड्याची काढणी करावी. या फुलदांड्याचा उपयोग फुलदाणीत सजावटीसाठी अथवा गुच्छ तयार करण्यासाठी करतात.
 • फुलदांडे जमिनीपासून १० – १५ सेंटिमीटर उंचीवर धारदार चाकूने कापून लगेच पाण्यात बुडवून ठेवावेत. दांडा कापताना जमिनीलगत न कापता पानांच्या वरील बाजूस कापावा.
 • सर्व फुलदांडे कापून बागेत झाडाखाली अथवा एखाद्या थंड खोलीत बादलीतच सहा तास ठेवावेत

Single_Tuberose_Uses
१०. उत्पादन – 

 • सर्वसाधारणपणे हेक्टरी ३ ते ४ लाख दांड्याची फुले किंवा १० ते १२ मे. टन फुले मिळतात.

 

११. खोडवा नियोजन – 

 • हंगाम संपल्यानंतर एप्रिलमध्ये बागेचे पाणी तोडून बागेस विश्रांती द्यावी.
 • ७-८ आठवड्यांच्या विश्रांतीनंतर हलकी खोदणी करून पुन्हा वरीलप्रमाणे खते द्यावीत.
 • अशा प्रकारे ३-४ वर्षांपर्यंत त्याच शेतात पीक घेता येते.

Related posts

Shares