Search

पाणि शुद्धिकरण करुया शेवगा बियाचा वापर करुन

पाणि शुद्धिकरण करुया शेवगा बियाचा वापर करुन

 

आपल्या देशात अशुद्ध पाण्यामुळे दर दिवसाला ९०० बालकांचा मृत्यू होतो आणि दर वर्षी सुमारे २ दशलक्ष लोकांना विविध आजाराची लागण होते. पाणी उपलब्ध नसल्यामुळे मैलोनमैल अंतर जाऊन पिण्याची पाण्याची व्यवस्था करावी लागतेय पण त्यामुळे होणाऱ्या परिणामाची यादी खूप मोठी आहे. ६५० दशलक्ष लोक हे शुद्ध पाण्यापासून वंचीत  आहे . त्यात ग्रामीण भागात आरोग्य सुविधा चांगल्या नसल्याने जास्त हाल अपेष्टामध्ये भर पडते.

यासाठी आपण अतिशय कमी खर्चात आपण पिण्याच्या पाण्याची शुद्धीकरणची व्यवस्था करू शकतो. या प्रक्रियेमुळे पाण्यातील हानिकारक जीवाणूच्या संखेमध्ये ९० ते ९९% घट होत असल्याचे दिसून आले आहे. आफ्रिकेमध्ये पाणी शुद्धीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर शेवगाच्या बियांचा वापर केला जात आहे.

त्यामध्ये पाण्याच्या शुद्धीकरणासाठी शेवग्याच्या बियांची भुकटी, तेल, तेल काढल्यानंतर शिल्लक राहिलेली पेंड याचा वापर केला जातो. अधिक गढूळ पाणी शुद्ध करण्यासाठी तेलाच्या पेंड पेक्षा भुकटी जास्त उपायकारक आहे.

एका बिपासुनची भुकटी एक लिटर पाणी शुद्ध करण्यासाठी पुरेशी आहे.

कसे करावे पाणी शुद्धीकरण शेवगा बियाचा वापर करून ?

वाळलेल्या शेंगा झाडावरून काढल्यानंतर बिया उन्हामध्ये २ ते ३ दिवस वाळविल्यानंतर बियांचे वरचे आवरण काढून मिक्सर किवा वाटा वरवांटा यांच्या सहायाने बारीक कराव्यात.

चहाच्या चाळणीने चाळून घ्यावे. कोरड्या हवाबंद प्लास्टीकच्या पिशवीत ही भुकटी १ ते २ महिन्यापर्यंत चांगली राहते.

१० लिटर पाणी शुद्ध करण्यासाठी अंदाजे २ ग्रॅम भुकटी १०० मी.लि. पाण्यात मिसळून घट्ट झाकण लावून पाच मिनिटे जोरात हलवावे त्यानंतर ५ ते १० मिनिटे शांत होऊन द्यावे. हे द्रावण २४ तास वापरू शकतो. शक्यतो दरवेळेस ताजे द्रावण वापरावे.

१० लि. पाण्यात वरील शेवग्याचे द्रावण सुती कापड व गाळणीच्या सहायने ओतून घ्यावे. ३० ते ६० सेकंद पाणी जोरात ढवळावे त्यानंतर पुढील ५ मिनिटे प्रती मिनिट १५ ते २० वेळा याप्रमाणे सावकाश ढवळावे.

झाकण ठेऊन सुमारे १ तासापर्यंत शांत राहून द्यावे. त्यानंतर स्वच्छ सुती कापडाने पाणी गळून घ्यावे पाणी नंतर ढवळू नये.

हे पाणी ८ तासापर्यंत जीवाणू मुक्त राहते म्हणून पिण्यासाठी आवश्यक तेवढेच पाणी शुद्ध  करावे .

घरच्याघरी १००% शुद्ध पाणी अल्प खर्चात आपण करू शकतो आणि बालमृत्यूचे , अशुद्ध पाण्यामुळे होणाऱ्या विविध आजाराचे प्रमाण आपण रोखू शकतो.

Moringa-leaves-and-seeds

Related posts

Shares