Search

मल्चिंग पेपर ने करा शेती, मिळावा अधिक नफा

[Total: 26    Average: 2.9/5]

शेती भारतातील पारंपारिक पण अत्यंत महत्वाचा उद्योग… शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यामुळे आपल्याला अन्न मिळते. शेतात काम करताना शेतकरी विविध प्रयोग करत असतात. इतरांपेक्षा काही तरी नवीन करून दाखविण्याची,  त्या विषयात आपली स्वतःची ओळख निर्माण करायची, अशी जिद्द बाळगणारे अनेक शेतकरी राज्यात आहेत. कधी शेडनेट, कधी ठिबक सिंचन, कधी सेंद्रिय शेती तर कधी पाण्याचा मर्यादित वापर करत मल्चिंग पेपर च्या मदतीने करण्यात येणारी शेती. अशा विविध प्रकारांचा कल्पकतेने वापर करत यशस्वी शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

या वर्षी महाराष्ट्रात पावसाचे दुर्भिक्ष्य शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय ठरलाय. अशा वेळी कमी पाणी असताना मल्चिंग पेपर च्या मदतीने करण्यात येणारी शेती हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. महत्वाचे म्हणजे मल्चिंग पेपर च्या मदतीने विविध पिकांची शेती करता येते. मल्चिंग पेपर आणि ठिबकसिंचन यांचा संगम शेतकऱ्यांना निश्चित पणे फायदा देऊ शकतो.

मल्चिंग पेपर च्या मदतीने करण्यात येणारी कलिंगड लागवड :

पूर्वमशागत:

लागवड करण्यापूर्वी आपल्याकडे उपलब्ध असलेली शेत जमिनीची जागा किंवा संपूर्ण क्षेत्र ठिबकखाली आणणे गरजेचे आहे. हे सगळे करण्याआधी पीक लागवड, व्यवस्थापन आणि बाजारपेठांचा अभ्यास करावा. चांगल्या उत्पादनाच्या दृष्टीने पहिल्यापासून गादीवाफा पद्धतीने लागवड, मल्चिंग पेपरचा वापर आणि ठिबक सिंचनावर भर दिला असता उत्पादन चांगले मिळू शकते. साधारणपणे एक एकरावर सुधारित पद्धतीने कलिंगडाची लागवड करताना शेताची चांगली नांगरट करून एकरी २० गाड्या शेणखत मिसळावे. त्यानंतर दोन गादीवाफ्यात तीन फुटाचे अंतर येईल या प्रमाणे पॉवर टिलरच्या साहाय्याने अडीच फूट रुंदीचा आणि १० इंच उंचीचा गादीवाफा तयार करावा. गादीवाफ्यामध्ये शिफारसीनुसार खते द्यावीत.

ठिबक संचाची जोडणी आणि मल्चिंग चा वापर  :

गादीवाफा एकसमान करून मधोमध ठिबकची लॅटरल टाकून ठिबक संचातून पाणी सोडून लॅटरल तपासणी करून घ्यावी. त्यानंतर गादीवाफ्यावर चार फूट रुंदीचा २५ ते ३०  मायक्रॉन जाडीचा मल्चिंग पेपर अंथरावा. मल्चिंग पेपर लावताना पेपर गादीवाफ्याला बेडला समांतर राहील, तो ढिला पडणार नाही याची काळजी घ्यावी कारण मल्चिंग पेपर ढिला राहिला तर वाऱ्यामुळे फाटण्याची शक्यता असते. मल्चिंग पेपर चा विचार करता एक एकरामागे साधारण ४ ते ५ किलो मल्चिंग पेपर लागू शकतो.

रोपांची पुर्नलागवड :

रोप लागवडीच्या आदल्या दिवशी लॅटरलच्या दोन्ही बाजूंस १५ सें.मी. अंतरावर रोपं लावता येतील अशा अंतरावर छिद्रे पाडून घ्यावीत. एका ओळीतील दोन छिद्रांमधील अंतर दोन फूट ठेवावे. छिद्रे पाडून झाल्यावर ठिबक सिंचन संचाच्या मदतीने गादीवाफा ओला करून घ्यावा. यानंतर छिद्रे पाडलेल्या ठिकाणी साधारण १२ दिवस वयाच्या रोपांची लागवड करून घ्यावी. अशा प्रकारे लागवड केल्यास एकरामागे साधारण ६००० रोपांची लागवड करता येऊ शकते. रोपांची लागवड करून झाल्यानंतर पहिले सहा दिवस रोज १० मिनिटे किंवा आवश्यकतेनुसार पाणी देण्यास सुरवात करावी. नंतर पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार पाण्याचे नियोजन करावे. गरजेनुसार आणि तज्ज्ञांच्या शिफारशीनुसार लागवडीनंतर खत द्यावे.

काढणी :

लागवडीनंतर साधारणपणे ९० ते १०० दिवसात उत्पादन तयार होते. कलिंगडाचा रंग आणि आकार वरून काढणीची वेळ ठरविता येते. त्याचप्रमाणे कलिंगडाच्या देठाजवळील बाळी  सुकली कि पिक काढणीस तयार झाले असे समजावे. साधारण लागवड केल्यास एकरी ७० ते ८० क्विण्टल तर प्लास्टिक मल्चिंग चा वापर केल्यास हेच उत्पादन १०० ते १२० क्विण्टल पर्यंत जाऊ शकते.

पूर्वमशागत :

कलिंगडाच्या विविध जाती :

शुगर बेबी, अर्का माणिक, रेड बेबी, ब्लॅक मार्शल, रेड एम्पेरिअल. कलिंगडाच्या या जातींची महाराष्ट्रात लागवड केली जाते.

मल्चिंग पेपर च्या मदतीने अशी नियोजनबद्ध शेती केल्यास मिळणाऱ्या उत्पादनात होणारी वाढ हि खरोखरच लक्षणीय आहे. कमी पाण्याचा वापर आणि अधिक उत्पादन या दोन्ही गोष्टींचा विचार केला तर शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने दुहेरी नफा मिळू शकतो. पण, यासाठी आवश्यक मार्गदर्शन आणि योग्य नियोजन करणे गरजेचे आहे.

Related posts

Shares