Search

गव्हावरिल रोग व किड नियंत्रण

गव्हावरिल रोग व किड नियंत्रण

भारतात रब्बी हंगामात  गहु हे अत्यंत महत्वाचे पिक आहे. या पिकावर डिसेंबर – जानेवारी महिन्यात अनेक किडी व रोगांचा प्रादुर्भाव आढळुन येतो. या रोग अथवा किडीची लक्षणे व प्रादुर्भाव ओळखुन त्या प्रमाणे त्याचे नियोजन करावे.

रोग व्यवस्थापन:

तांबेरा:

wheatpest2

लक्षणे:

 • तांबेराचे दोन प्रकार असून नारंगी तांबेरा व काळा तांबेरा या नावाने ओळखला जातो.
 • तपकिरी (तपकिरी अंधूक लाल) रंगाच्या पुळ्या उठणे हे या रोगाचे प्रमुख लक्षण आहे. अशा प्रकारे असंख्य पुळ्या खोड व पानभर दिसतात.
 • पिकांची वाढ पूर्णावस्थेकडे झुकताच व हवेतील तापमान जसे वाढत जाते तसतसे या पुळ्यांचे रूपांतर काळ्या रंगात होते.

नियंत्रण –

 • पंचवटी, गोदावरी, त्र्यंबक, एनआयएडब्ल्यू- 34, तपोवन किंवा नेत्रावती या वाणांची लागवड करावी.
 • रोगाचा प्रादुर्भाव होताच प्रोपीकोनॅझोल 200 मि.लि. प्रति 200 लिटर पाणी या प्रमाणात 15 दिवसांच्या अंतराने दोन वेळा फवारणी करावी.
  या बुरशीनाशकाला पर्याय म्हणून मॅन्कोझेब किंवा कॉपर ऑक्‍सीक्‍लोराईड प्रत्येकी दोन ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.
 • रासायनिक खतांची संतुलित मात्रा घ्यावी. नत्राचा शिफारशीपेक्षा अधिक वापर केल्याने गव्हाचे पीक तांबेरा रोगास जास्त प्रमाणात बळी पडते.
 • पाणी जरुरीपुरतेच द्यावे.

 

काणी रोग- 

wheatpest5
रोगाची बुरशी बियांमध्ये असते. अशा बियांपासून आलेली रोपे काणीग्रस्त ओंबी देतात. रोगट बियांपासून उगवलेल्या झाडांच्या काणीग्रस्त ओंब्या लवकर बाहेर पडलेल्या दिसतात. त्यानंतर ती बीजांडकोशावर वाढून त्याची काळी भुकटी तयार होते. रोगग्रस्त बियाण्याचा वापर केल्यास रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो.

नियंत्रण 

 • वापरण्यापूर्वी चार तास बियाणे थंड पाण्यात भिजवावे व त्यानंतर उष्ण पाण्याची प्रक्रिया 54 अंश तापमान असलेल्या पाण्यात 10 मिनिटे बुडवून काढावे. त्यानंतर सावलीत वाळवावे.
 • पेरणीपूर्वी बियाण्यास कार्बेन्डाझिम दोन ग्रॅम प्रति किलो प्रमाणात बीजप्रक्रिया करावी.
  काणीग्रस्त रोगट झाडे दिसताच ती नष्ट करावी.

 करपा- 

wheatpest6

 • पानावर हिरवट पिवळसर ठिपके दिसून येतात. कालांतराने ठिपके लांबट- गोल व नंतर काळपट होऊन सर्व पानांवर पसरतात व पाने करपतात.
 • पाने शेंड्याकडून खाली करपत येतात.

नियंत्रण 

 • पेरणीसाठी रोगमुक्त शेतातील बियाणे वापरावे.
 • पेरणीपूर्वी बियाण्यास थायरम चार ग्रॅम किलो या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी.
 • रोगाचा प्रादुर्भाव दिसताच कॉपर ऑक्‍सिक्‍लोराइड (2 टक्का) अधिक मॅन्कोझेब (0.2 टक्का) ही फवारणी 15 दिवसांच्या अंतराने करावी.

 

 

 

 

मावा –

wheatpest7

लक्षणे:

 • ही कीड फिकट पिवळसर- काळपट, हिरवट रंगाची साधारणपणे दोन ते तीन मि.मी. लांबीची, असते. या किडीच्या शरीराच्या पाठीमागच्या बाजूस दोन नलिकांसारखे अवयव असतात.
 • या किडीचे पिल्ले व प्रौढ पानांच्या पाठीमागील बाजूस, कोवळे शेंडे तसेच खोडावरील पेशीरस शोषून घेतात.
 • गहू पिकाचे पाने पिवळसर, रोगट होतात.
 • ही कीड मधाप्रमाणे गोड चिकट द्रव विष्ठेद्वारे पानांवर, खोडावर व गव्हाच्या कोवळ्या शेंड्यांवर टाकते. त्यावर बुरशी वाढून पानाची प्रकाशसंश्‍लेषण क्रिया बंद होते.
 • परिणामी, गव्हाचे रोपे किंवा झाडे मरतात आणि पीक उत्पादनात मोठी घट येते.

नियंत्रण-

 • मावा किडीने साधारणपणे दहा मावा कीड प्रति रोप गाठल्यानंतरच कीड नियंत्रणासाठी पुढील उपाययोजना करावी.
 • जैविक उपायांमध्ये व्हर्टिसिलियम लेकॅनी किंवा मेटारायझियम प्रत्येकी 50 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यातून 10 ते 15 दिवसांच्या अंतराने दोन वेळा फवारावे.
 • थायामिथोक्‍झाम (25 डब्ल्यूजी) एक ग्रॅम किंवा ऍसिटामिप्रीड पाच ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यातून 10 ते 15 दिवसांच्या अंतराने दोन वेळा फवारावे.

 

तुडतुडे – 

download

लक्षणे:

 • तुडतुडे हे कीटक तीन ते चार मि.मी. लांब, पाचरीच्या आकाराचे हिरवट- राखाडी रंगाचे असतात आणि हे गव्हाच्या पानांवर दोन्ही बाजूंस तिरकस चालताना आढळून येतात.
 • तुडतुडे पानातील अन्नरस शोषून घेतात.
 • पानांचे शेंडे पिवळे पडतात व रोपाची वाढ खुंटते.

नियंत्रण –

 • डायमिथोएट (30 ईसी) 15 मि.लि. प्रति 10 लिटर पाण्यातून फवारावे.
 • पिकावर मावा आणि तुडतुडे एकत्रितपणे आढळून आल्यास मावा किडीच्या नियंत्रणासाठी शिफारस केलेल्या उपायांचा वापर करावा.
 • त्यामुळे तुडतुड्यांच्या नियंत्रणासाठी वेगळी उपाययोजना करण्याची गरज नाही.

कोळी :

download (1)

लक्षणे:

 • ही कीड लांब वर्तुळाकार, लाल- पिवळसर, पांढरट तपकिरी रंगाची असून ती पानांच्या पाठीमागच्या बाजूस राहून पानांतील रस शोषण करते.

नियंत्रण –

या किडीच्या नियंत्रणासाठी पाण्यात मिसळणारे गंधक (80 डब्ल्यूपी) 20 ग्रॅम किंवा डायकोफॉल 10 मि.लि. किंवा डायमिथोएट 15 मि.लि. किंवा ऍबामेक्‍टिन तीन मि.लि. प्रति 10 लिटर पाण्यातून 10 ते 12 दिवसांच्या अंतराने किमान दोन वेळा आलटून पालटून फवारावे.

Related posts

Shares