Search

जागतिक आदिवासी दिन विशेष : “वयम्” – आपल्या विकासाची आपली चळवळ

जागतिक आदिवासी दिन विशेष : “वयम्” – आपल्या विकासाची आपली चळवळ

vayam new

९ ऑगस्ट हा दिवस ‘जागतिक आदिवासी दिन’ या नावाने साजरा केला जातो. असं म्हणतात; भारत देश विवीधतेने नटलेला आहे. हि विविधता अनेक जाती, जमाती,धर्म, परंपरांमुळे संपन्न झाली आहे. यामध्ये वनवासी समाजाचा प्रामुख्याने उल्लेख केला पाहिजे. महाराष्ट्रातही अशा अनेक जमाती पहायला मिळतील. या वनवासी जमातींचे भारतीय संस्कृतीत असलेले अवर्णनीय आहे. वारली चित्रकला, संगित, नृत्य हि याची साक्ष आहे. असे असले तरी, हाच आपल्या समाजाचा एक घटक आपल्या बरोबर आहे का? या प्रश्नाचा विचार केला असता आपणांस जाणवते कि, वनवासी क्षेत्रांत पायाभुत सुविधांचा अभाव, निरक्षरता, बेरोजगारी, भ्रष्टाचार एक नाही अशा अनेक अडचणी या समाजाचे जीवन पोखरुन काढत आहेत.

या सर्व अडचणींवर मात करण्यासाठी या समाजात स्वाभिमानाची ठिणगी पडणे आवश्यक आहे. व ठिणगी निर्माण करण्यासाठी पालघर जिल्ह्यातील जव्हार या दुर्गम वनवासी क्षेत्रात ‘वयम’ चळवळ उदयास आली. वयम् या संस्कृत शब्दाचा “आम्ही” असुन “आपल्या विकसाची आपली चळवळ” हे याचे ब्रीद आहे. स्थानिक तरुण मुलांना कायद्याचं ज्ञान देवून सक्षम करणं, स्वत:चे प्रश्न स्वत: सोडवण्यासाठी त्यांना प्रवृत्त करणं अशा स्वरुपाचं कार्य हे २००८ पासुन निरंतरपणे चालु आहे. तसेच हि केवळ संस्था नसुन हि एक चळवळ आहे असे या संस्थेचे कार्यकर्ते श्री. मिलींद थत्ते यांचे वक्तव्य आहे.

 

वयम् कार्याचा आढावा :

वयम्’तर्फे अनेकदा माहितीचा अधिकार, रेशनचे नियम, रोजगार हमीचे नियम, वनहक्काविषयीचे कायदे यासंदर्भात आदिवासी भागातील तरुण मुलांसाठी शिबीरं/वर्ग घेतले जातात. आणि त्या वर्गात शिकवायलाही बाहेरून तज्ज्ञ न बोलावता स्थानिक तरुण मुलं जे हे कायदे शिकलेत, त्यातून जे आपल्या गावातले प्रश्न सोडवत आहेत, तेच तरुण या शिबिरात शिकवतात. कायदा शिकून ज्यांना प्रश्न दिसू लागतात, ते तरुण मग आपापल्या गावातले प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतात.

हे कायदे कुणी-कुणासाठी आणि कसे वापरायचे, याचं प्रशिक्षण वयम् च्या आदिवासी भागातल्या प्रत्यक्ष त्यांच्या भागात काम करणा-या कार्यकत्र्यानीच दिलं! नुस्तं पुस्तकी कायदा नाही तर तो आपण कसा वापरला हे सांगत असताना, कायदा वापरण्याचं ‘व्यवहारज्ञान’ही या शिबिरांमार्फत मिळतं.

काही मूठभर शहरी लोकांनी काही आदिवासी लोकांसाठी सेवाभावी कामं करणं असं वयम्’चं स्वरूप नाही. ‘आपल्या विकासाची आपली चळवळ’ असं सार्थ करत गेली सहा वर्षे वयम्’चे कार्यकर्ते त्यांनी स्वतः आपल्या गावासाठी केलेल्या गोष्टी इतरांना सांगत, पटवत गावोगावी फिरत आहेत.

वनहक्क, रोजगार हमी, ग्रामपंचायत, माहिती अधिकार अशा काही मूलभूत महत्त्वाच्या कायद्यांचा अभ्यास व वापर या कार्यकर्त्यांनी आधी स्वतःच्या गावात केला. आता आसपासच्या गावांमध्ये त्याचा प्रसार करून त्यायोगे गावातील धडपड्या तरूणांना सक्षम नेतृत्वामध्ये बदलण्याच्या टप्प्याला ‘वयम्’ पोचली आहे.

dsc_0819

कुठल्याही शासकीय यंत्रणेला सतत वचकून राहणारा ही आदिवासी माणसाची जुनी ओळख. पण आता स्वतःत आपण होऊन हळूहळू बदल घडवत काही गावं यंत्रणेला प्रश्न विचारत आहेत- सहकार्याच्या समान पातळीवर पोचत आहेत- वेळ पडल्यास दोन हात करत आहेत.

मागच्याच आठवडय़ात कोकणपाडा या गावाला ‘सामूहिक वन संसाधन हक्क’ प्रदान करण्यात आले. कोकणपाडा हे 56 घरांचे, बव्हंशी कोकणा जमातीचे छोटेसे गाव. या गावाला 18 हेक्टरच्या छोटय़ाशा जंगलपट्टय़ावर वन संसाधन हक्क मिळाले. असेच डोयापाडा-कासपाडा-अळीवपाडा या तीन वारलीबहुल पाडय़ांना मिळून 150 हेक्टर जंगलाचे हक्क मिळाले. ढाढरी या कठाकूर जमातीच्या गावाला 284 हेक्टरचे हक्क मिळणार आहेत. असे हक्क गडचिरोली, गोंदिया आणि विदर्भातल्या इतर जिल्ह्यांमधल्या अनेक गावांना यापूर्वीच मिळाले आहेत.

नेतृत्व विकास हा वयम्’च्या कामाचा गाभा. गावाच्या विकासात पुढाकार घेणा-या तरूणांचे हात बळकट करणारा कार्यक्रम म्हणजे वयम्’ची नेतृत्व शिबिरे. वयम्’च्या बॅनरपेक्षा वयम्’चे चळवळ तंत्र सर्वत्र उतरावे हा ध्यास. यातूनच – मोखाडा तालुक्यात परिवर्तन महिला संस्था आणि महाराष्ट्र प्रबोधन सेवा मंडळ यांनी वयम्’कडून काही तंत्रे घेतली. त्यांच्या गावांमध्ये लोक जैवविविधता नोंद, संयुक्त वन व्यवस्थापन, रोजगार हमी कायदा, माहिती अधिकार, आणि युवक संघटन अशा पैलूंची नांदी झाली आहे.

img_0020

चिपळूण तालुक्यातल्या (जि. रत्नागिरी) खेरशेत गावातल्या तरुणांच्या ‘गाव विकास आघाडी’ने वयम्’कडून दूरस्‍थ शिक्षण घ्यायला सुरूवात केली आहे. त्यांच्या गावची ग्रामसभा सशक्त करण्यासाठी आणि ग्राम पंचायत पारदर्शक करण्यासाठी त्यांना वयम्’चे मंत्र उपयोगी पडताहेत.

भर मुंबईत चारकोपमधल्या ‘नागरिक मंचा’नेही वयम् मंत्र उचलून महानगरपालिकेच्या स्थानिक व्यवस्थापन कमिटीत आपला सहभाग वाढवला आहे.

वनविभागाच्या सहकार्याने चालणार्या संयुक्त वन व्यवस्थापन कार्यक्रमावर वयम्’च्या तरूण मंडळांनी मांड ठोकली आहे. डोयापाडा गावात कुर्हाडबंदी व चराईबंदी झाली आहे, 2,000 नवीन झाडे लावली आहेत,

‘वयम् जलकुंड’ – 1x1x1 मीटरचा शेतकर्याने स्वतः खोदलेला खड्डा, त्यात वयम्’च्या मित्रांनी दिलेले प्लॅस्टिक अंथरले की झाले जलकुंड. यात 3,000 लिटरपेक्षा जास्त पाऊसपाणी साठते. वर बांबू-सागपानांचे झाकण घातले की वाफही होत नाही. साताठ महिने हे पाणी टिकते. 100 शेतकर्यानी ही जलकुंडे खोदली. त्यांपैकी काहींनी पाऊस अचानक नाहीसा झाला तेव्हां नाचणीचे पीक वाचवण्यासाठी हे पाणी वापरले, काहींनी पावसाळ्यानंतर भाजीपाल्यांची दोन पिके घेतली आणि बाजारात उत्त‍म भाव मिळवला, तर काहींनी हे पाणी आंबे आणि काजू शिंपायला वापरले आहे.

vayam_dapti4

“रानभाजी पाककला स्पर्धा” हा यंदाचा स्टार कार्यक्रम झाला. सात गावांमध्ये हा कार्यक्रम तेथील गणेशोत्सव मंडळे आणि वयम् यांनी संयुक्तपणे केला. 103 सुगरणींनी भाग घेतला, सजवलेल्या ताटांमध्ये नटून 69 रानभाज्यांनी आपली दखल घ्यायला लावली.

अशाप्रकारे वयम् चे कार्य अविरतपणे चालु असुन अशा चळवळींपासुन आपणही स्फुर्ती घेऊन आपल्या विभागातील समस्या जाणुन घेऊन त्यावर समर्थपणे लढा दिला पाहिजे.

संदर्भ :१.  http://www.lokmat.com/storypage.php?catid=31&newsid=1379

२. https://vayamindia.wordpress.com/

Related posts

Shares